scorecardresearch

Premium

संतोष माने खटल्याचे सत्र न्यायालयातील कामकाज पूर्ण

संतोष माने हा त्याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत जाणीवर्पूवक न्यायालयासमोर बाजू सांगत नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाशीध व्ही. के. शेवाळे यांनी सुनावणीच्या वेळी नमूद केले.

संतोष माने खटल्याचे सत्र न्यायालयातील कामकाज पूर्ण

संतोष माने हा त्याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत जाणीवर्पूवक न्यायालयासमोर बाजू सांगत नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाशीध व्ही. के. शेवाळे यांनी सुनावणीच्या वेळी नमूद केले. मानेला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात जबाब घेण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले.
स्वारगेट एसटी स्थानकातून बस चोरून भरधाव चालवत नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी संतोष मानेला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. माने याने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शिक्षेवर म्हणणे मांडण्यास सत्र न्यायालयात वेळ दिला नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अॅड. धनंजय माने यांनी केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचा जबाब घेण्यासाठी हा खटला परत सत्र न्यायालयाकडे पाठविला होता. सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होताच अॅड. धनंजय माने यांनी संतोष माने हा जबाब देण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सक्षम आहे का, याची तपासणी करावी आणि त्यानंतर त्याचा जबाब नोंदवा, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने येरवडा मनोरुग्णालयास मानेची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. येरवडा मनोरुग्णालयाच्या तीन डॉक्टरांच्या पॅनलने मानेची तपासणी करून तो मानसिक रुग्ण नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर संतोष मानेचा जबाब नोंदविण्यास न्यायालयाने सुरुवात केली.
संतोष मानेला न्यायालयाने बुधवारी काही प्रश्न विचारले. शिक्षेसंदर्भात काही बाजू मांडायची आहे का, बचावासाठी काही पुरावे न्यायालयासमोर द्यायचे आहेत का असे काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, मानेने त्या प्रश्नाला उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर न्यायालयाने अॅड. धनंजय माने यास शिक्षेसंदर्भात काही म्हणणे सादर करायचे आहे, अशी विचारणा केली. त्या वेळी अॅड. माने यांनी आरोपीला काही समजत नसल्याचे नमूद करत शिक्षेसंदर्भात सांगण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. त्यानुसार या खटल्याची पुढील सुनावणी आता ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

spying for Pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याच्या खटल्यावर निर्णय कधी? उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला विचारले…
Arrest of Kochhar couple is misuse of power high court comments on CBIs action
कोचर दाम्पत्याला अटक ही सत्तेचा दुरूपयोगच, अटक बेकायदा ठरवताना सीबीआयच्या कृतीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
lawyer couple s murder case in rahuri lawyer remain absent from work in mumbai sessions court
राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येचे प्रकरण : निषेधार्थ मुंबईतील कनिष्ठ न्यायालयांतील वकिलांचे आज कामबंद आंदोलन
Case of challenge to draft Kunbi certificate to Marathas High Court refuses to hear urgent plea of OBC organization
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मसुद्याला आव्हानाचे प्रकरण : ओबीसी संघटनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Santosh mane case complete of session courts work

First published on: 21-11-2013 at 02:41 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×