राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी संध्याकाळी त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
अस्वस्थ वाटू लागल्याने पवार यांना रविवारी संध्याकाळी तातडीने रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. मूत्रिपडाच्या कार्यात सौम्य बिघाड झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले, मात्र त्यांचा रक्तदाब स्थिर असून, पुढील दोन दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती रुबी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. परवेज ग्रँट यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2016 रोजी प्रकाशित
शरद पवार रुग्णालयात दाखल
शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने संध्याकाळी त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-01-2016 at 02:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar admit in hospital