शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शहरात जोरदार वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला.
सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील शिवसेना भवनात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
आकुर्डी गावठाणात आरोग्य शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. रहाटणीत गुणवंतांचा गौरव करण्यात आला. निगडी प्राधिकरणात छत्रीवाटप करण्यात आले. चिंचवड मोहननगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. काळेवाडीतील विजयनगर तसेच तापकीरनगर येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शिवसेनेने शहरात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena celebrates golden anniversary with various activities in pimpari
First published on: 20-06-2016 at 00:56 IST