पुणे : चिऊ-काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत बालवयात प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणाऱ्या पुण्यातील वेदांशी भोसले हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला आहे. अवघ्या तीन वर्षांची ही चिमुकली परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाते. सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर आहे.

वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असून सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात रहात आहे. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात तीन मिनिटे आणि ५८ सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा तिने गायला आहे. सर्वात लहान वयात (वय ३ वर्ष ५ महिने १९ दिवस) पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे. आई प्रीती भोसले ही गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. दोन वर्षांची असल्यापासून वेदांशी मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरती म्हणते.

Shahu Vichar Darshan Padyatra, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj s Centenary Golden Jubilee , Centenary Golden Jubilee, Rajarshi Shahu Maharaj Kolhapur, Kolhapur, dr jai singh rao pawar,
शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on 28th June
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जूनला प्रस्थान; ‘असा’ आहे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

हेही वाचा – “मी कोणाशी बोलायचे तो माझा अधिकार”, पाहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

हेही वाचा – पुणे : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संतोष भोसले म्हणाले, परदेशात वडीलधाऱ्या मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न आम्ही करीत असतो. प्रीती भोसले म्हणाल्या, मी वेदांशीला दररोज मराठी भक्तिगीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असे. मन लावून वेदांशी या सगळ्या गोष्टी ऐकून अनुकरण करायचा प्रयत्न करायची. या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते.