लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. महिला प्रवर्गातून आश्लेषा जाधव यांनी राज्यात पहिला, तर मागास प्रवर्गातून कोल्हापूरच्या रोहित बेहेरे यांनी पहिला क्रमांक मिळवला.

MPSC, MPSC examinees, MPSC latest news,
स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा… राज्य शासनाकडून ते’ परिपत्रक रद्द
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
Sharad Pawar On Maharashtra bandh
Maharashtra Bandh : ‘उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या’, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवारांचं आवाहन
supplementary exam, 12th supplementary exam results,
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर… किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण?
10th and 12th supplementary examination result tomorrow pune news
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा उद्या निकाल
MPSC, MPSC combine exam,
‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…
Agitation warning of competitive examination students for the recruitment of 258 posts in agriculture department pune news
कृषि विभागातील २५८ पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य कर निरीक्षक संवर्गातील १५९ पदांचा अंतिम निकाल उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला. उमेदवारांच्या माहितीसाठी परीक्षेचा अंतिम निकाल, प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (कटऑफ) एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

आणखी वाचा-कोथरुडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; गुन्हे शाखेचा छापा, दहा सट्टेबाज अटकेत

उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढ‌ळून आल्यास, अर्जातील दाव्यानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना आणि अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास गुणपत्रके ऑनलाइन खात्यात पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत एमपीएससीकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.