संस्कृत आणि मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका सुमती टिकेकर यांचे पुण्यात रविवारी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. अभिनेते उदय टिकेकर यांच्या आई व आरती अंकलीकर टिकेकर यांच्या त्या सासूबाई होत्या. सुमती टिकेकर या जयपूर घराण्याच्या शास्त्रात्य गायिका होत्या. बालगंधर्वांची नाटय़पदे गाण्यामध्ये त्यांची ख्याती होती. नाटय़संगीतामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ‘संगीत वरदान’, ‘संगीत मान-अपमान’,‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’ यासह अनेक गाजलेल्या संगीत नाटकात त्यांनी भूमिका बजावल्या. अनामिक नाद उठे गगनी, आठवणी दाटतात, श्रीरामाचे दर्शन घडले ही त्यांची विशेष गीते आहेत.