पुणे : बारामती मतदार संघातून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होणार आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची रितसर घोषणाच करून टाकली आणि सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आणि किरण गुजर या तिघांचा समावेश असून ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणार आहे.

हेही वाचा…खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखपदी बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर-वेल्हा-मुळशीमध्ये कुलदीप कोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunetra pawar files nomination from baramati ajit pawar announces campaign chiefs for mahayuti pune print news psg 17 psg