पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील तहसीलदारास एक कोटीची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी उरवडे गावच्या हद्दीत लवासा रोडवर रंगेहाथ पकडले. सचिन महादेव डोंगर (वय 43, रा.बावधन) असे लाच स्वीकारणाऱ्या तहसीलदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वारस नोंदीचे प्रकरण मंत्रालयातून फेरचौकशीसाठी तहसीलदार सचीन डोंगरे यांच्याकडे आले होते. या प्रकरणाचे निकालपत्र देण्यासाठी आणि त्याची सातबारा च्या उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी सचीन डोंगरे यांनी तक्रारदार यांना एक कोटींची लाच मागितली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याची तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता. सापळा रचून लवासा रोड येथे तहसीलदार सचिन डोंगरे याला तक्रारदार एक कोटींची लाच देताना रंगेहाथ पकडले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tahsiladars caught red handed while taking a bribe of one crore
First published on: 29-12-2018 at 22:37 IST