सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोलिसांकडून नराधमाचा शोध सुरू

rape, molestation,
प्रतिनिधिक छायाचित्र

पिंपरीतील सांगवी भागात माणुसकीला काळीमा फासणारा एक प्रकार घडला आहे. एका सावत्र बापाने त्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. एवढ्यावरच हे क्रौर्य थांबले नाही. तर मोठ्या मुलीवर वाईट नजर ठेवत तिचे अर्ध नग्न अवस्थेत फोटोही काढले. अद्याप या नराधमाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरात थांबवून हा नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होता. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकीही त्याने तिला दिली होती. हा नराधम  १५ वर्षांच्या मुलीला रोज मारहाणही करत होता अशी माहितीही पोलिसांनी दिली. १५ वर्षांच्या मुलीने रोज होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून आईसह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे. तसेच पोलीस या नराधमाचा शोध घेत आहेत.

मोठ्या मुलीवर वाईट नजर ठेवत त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने या सगळ्या प्रकाराला कडाडून विरोध केला. तेव्हा या मुलीचे अर्धनग्न फोटो काढून तिला जिवे मारण्याची धमकीही या नराधमाने दिली. आता पोलीस या नराधमाचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सगर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Teenage girl raped by her step father in pimpri

ताज्या बातम्या