scorecardresearch

Premium

पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत; घराच्या काचा फोडल्या

किरकोळ वादातून टोळक्याने गहुंजेत धुडगूस घातला. कोयत्याने घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान करत आरडा-ओरड केली.

Terror of Koyta Gang Gahunje
पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत; घराच्या काचा फोडल्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

पिंपरी : किरकोळ वादातून टोळक्याने गहुंजेत धुडगूस घातला. कोयत्याने घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान करत आरडा-ओरड केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सागर जालिंदर बोडके (वय २६, रा. गहुंजे, मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्ज्वल मळेकर, करण भिसेला ताब्यात घेतले आहे. तर, विकी शर्मा याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

yavatmal theft marathi news, jewellery of rupees 30 lakhs stolen yavatmal marathi news, raymond company s housing colony yavatmal
‘रेमंड’मधील अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चक्क ३० लाखांचे दागीने लंपास; सुरक्षा भेदून चोरी
Onion Peels Jugadu Water For Jaswandi Plant Hibiscus Will Get Lots Of Buds Kaliyan With These Marathi Gardening Hacks
Video: जास्वंदाच्या रोपाला कांद्याच्या सालींचं ‘हे’ खत दिल्याने भरभर येतील कळ्या; फुलांनी बहरून जाईल कुंडी
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात
youth faked his own kidnapping
वसई : कर्जवसुलीसाठी एजंटच्या धमक्या, कंटाळून तरुणाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

हेही वाचा – राज ठाकरे पुण्यात

हेही वाचा – पुणे : वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक, मनसेच्या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

फिर्यादी सागर आणि विकी यांच्यात मामुर्डीतील मांडव टाहाळ्यात किरकोळ वाद झाला होता. त्या वादातून विकी सोमवारी फिर्यादीच्या घरात घुसला. त्याच्या आई-वडिलांना कोयत्याचा धाक दाखविला. शिवीगाळ करत वडिलांची कॉलर पकडून तुम्हाला माज आला आहे. तुमचा मुलगा सागर बोडकेचा खून करतो, त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. हातातील कोयत्याने घराच्या समोरील खिडकीचा काच फोडली. गल्लीत आरडा-ओरडा करुन दहशतीचे वातावरण केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terror of koyta gang in gahunje the windows of the house were broken pune print news ggy 03 ssb

First published on: 28-11-2023 at 14:44 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×