पिंपरी-चिंचवड येथील मंगल कार्यालयात लग्नकार्य सुरू असतानाच चोरट्यांनी वराच्या खोलीतून तब्बल दोन लाखांची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ताथवडे येथे घडली. चोरीचा सर्वप्रकार मंगल कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील राजेंद्र रामचंद्र महाडिक (रा. सहकार वसाहत, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांच्या मुलाचा विवाह सोहळा ताथवडे येथील रघुनंदन मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता होता. यावेळी राजेंद्र यांनी त्यांच्या पत्नीकडे १ लाख ५२ हजार रुपयांची रोकड दिली होती. तसेच दीड तोळे सोनं हे पर्समध्ये ठेवले होते. मात्र काही कामानिमित्त त्या वराच्या रूममध्येच पर्स ठेऊन बाहेर आल्या. त्याचवेळी चोरट्याने पर्सवर डल्ला मारला. हा सर्व प्रकार मंगल कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft in wedding in pimpri chinchwad rupees two lakhs cash and ornaments lost
First published on: 13-12-2017 at 18:48 IST