पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमबीए) प्रवेशासाठी आता राज्य सरकारची सीईटी, सीमॅट आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी कॅट याच परीक्षा ग्रा धरल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत एमबीए प्रवेशासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एमबीए’साठी प्रवेश दिला जाणार नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट के ले आहे.
राज्यातील व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयात एमबीए प्रवेशासाठी आतापर्यंत खासगी व्यवस्थानाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जीमॅट, मॅट, अॅटमा आणि क्झ्ॉट अशा प्रवेश परीक्षांतील गुण ग्राह्य़ धरले जात होते. मात्र, या प्रवेश परीक्षांवेळी परीक्षा केंद्रांवर पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसणे, निकाल जाहीर झाल्यानंतर गुण पडताळणीसाठी ऑनलाइन यंत्रणा नसणे, परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी उद्भवणे अशा समस्या असल्याचे आढळले. तसेच २०१८-१९मध्ये २६ विद्यार्थ्यांनी बनावट गुणपत्रिकेच्या आधारे एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले होते. त्याचप्रमाणे २०१९-२० मध्येही काही विद्यार्थ्यांनी बनावट गुणपत्रिकेच्या आधारे एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर एकूण परिस्थिती लक्षात घेता राज्यात एमबीए प्रवेशासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा ग्राह्य धरल्या जाव्यात या बाबत मार्गदर्शन आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याबरोबरच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती.
या समितीने केलेल्या सूचनांनुसार २०२०-२१च्या एमबीए प्रवेशासाठी जीमॅट, मॅट, अॅटमा आणि क्झॅट या परीक्षा वगळून केवळ राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेतली जाणारी एमबीए-सीईटी, राष्ट्रीय स्तरावरील सीमॅट आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) होणारी कॅट याच परीक्षा ग्राह्य़ धरण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.