डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झालेले नाही.
पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्र जारी केलं. मात्र तब्बल दोन महिने उलटूनही मारेकरी मोकाट असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे.
पोलिसांची १९ पथके मारेकऱ्यांना पकडण्यासाठी कार्यरत आहेत. पण, त्यांचे हाती अद्याप काही लागलेले नाही. विशेष म्हणजे दाभोळकरांच्या हत्येचा तपास करत असताना इतर काही गुन्ह्यांतील आरोपींचा शोध पोलिसांना लागला. मात्र, दाभोळकरांचे मारेकरी अजूनही हाती लागले नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2013 रोजी प्रकाशित
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला २ महिने पूर्ण
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत.
First published on: 20-10-2013 at 10:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two months completed to dr narendra dabholkars murder