पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी पोलीस ठाण्याच्या पटांगणात असलेल्या गुन्ह्यात जमा केलेल्या मोटारींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली असून यात १३ मोटारी आणि दोन रिक्षा आगीत जळून खाक झाल्या आहेत. घटनस्थळी पोहचत तीन अग्निशमन बंबानी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. अद्याप आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या पटांगणात गुन्ह्यात शेकडो वाहन जप्त केलेली आहेत. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश असून आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक वाहनांना भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोहचेपर्यंत 13 मोटारी आणि दोन रिक्षा असे एकूण 15 वाहन आगीत जळून खाक झाली आहेत.

दरम्यान, वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग इतरत्र पसरली नाही. अन्यथा आणखी वाहन आगीत जळून खाक झाली असती. दरम्यान, आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. अशाच प्रकारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात हजारो वाहन गुन्ह्यात जप्त केली असून ती पडून आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicles caught fire in pimpri kjp 91 dmp
First published on: 09-11-2020 at 17:58 IST