scorecardresearch

पुणे : शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२४ मार्च) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

No water Thane district
(प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र)

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फ्लो मीटर बसविण्याचे, पर्वती ते एसएनडीटी दरम्यानच्या अस्तित्वातील १ हजार २०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून होणारी गळती रोखणे आणि चतु:श्रृंगी येथील पाण्याच्या टाकीची वाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडण्याच्या कामामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (२३ मार्च) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२४ मार्च) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

औंध, बोपोडी, औंध रस्ता, खडकीचा काही भागा (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आयटीआय रस्ता, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थनगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रस्ता, बाणेर रस्ता परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, आयसीएस काॅलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन या चतु:श्रृंगी टाकी परिसराबरोबरच चिखली जलशुद्धीकरण केंद्रा अंतर्गत गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती, आळंदी रस्ता, टिंगरेनगर, आदर्श काॅलनी, बर्माशेल झोपडपट्टी, पुणे विमानतळ, लोहगांव, राजीव गांधी नगर, विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बाह्यवळण रस्ता या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:55 IST

संबंधित बातम्या