पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता असतानाच ‘हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत’ असे सांगत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर प्रथमच जाहीरपणे दावा केला. ज्या पक्षाची ताकद जास्त त्यालाच ही जागा मिळावी, असेही पवार यांनी सांगितले.

पुण्यात टिंबर मार्केटमधील पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की पुण्याची पोटनिवडणूक लागणार असल्याचे मला समजले आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असल्याने पोटनिवडणूक लागणार नाही, असे वाटत होते. पण बहुतेक गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी माहिती आहे. आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते. शहरात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. खासगीमध्ये रवींद्र धंगेकरांनापण विचारा. त्यांना निवडून आणण्याकरिता सगळ्या आघाडीच्या पक्षांनी सहकार्य केले.

Solapur lok sabha seat, ram satpute, BJP Candidate, Mosques Issuing Fatwas, Vote for Congress, Fatwas Vote for Congress, Qazi Denies Accusations, praniti shinde, bjp, hindu muslim,
मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे; भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा आरोप
independent candidate, madha constituency, buffalo, yamraj costume, filed nomination, independent candidate, ram gaikwad
‘यमराज’ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात ? रेड्यावर बसून उमेदवाराची जोरदार एन्ट्री
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
Hingoli Candidate Hemant Patil Changed by Shiv Sena
शिंदे गटाला धक्का! शेवटच्या टप्प्यात हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची नामुष्की; हेमंत पाटील यांचे तिकीट कापले

हेही वाचा – पुणे : सदाशिव पेठेत अमली पदार्थांची विक्री; एकाला अटक

निवडणूक लागेल तिथे मित्र पक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद पाहण्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांची माहिती घ्यायची. साधारण कोणाला किती मते पडली, अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. काँग्रेसने आपणच ही जागा लढणार असल्याचा दावा केला, यावर अजित पवार यांना विचारले असता, तो त्यांचा अधिकार आहे, आमच्या मित्र पक्षाला माझ्या शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले.