लोणावळा : लोणावळा शहरात खासगी बंगल्यातील जलतरण तलावात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. खंडाळा भागातील एका बंगल्यातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

निखिल संपत निकम (वय २२, रा. चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. लोणावळ्यात मंगळवारी (३ जानेवारी) निखिल आणि त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. निखिलच्या मित्राचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यांनी खंडाळा भागातील एक बंगला भाडेतत्वावर घेतला होता. मंगळवारी रात्री निखिल बंगल्यातील जलतरण तलावात उतरला. पोहताना ताे बुडाला. निखिल बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, उपनिरीक्षक मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केली असून या प्रकरणी तपास करण्यात येत आहे.

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..

हेही वाचा – ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करा, पालकमंत्री चंद्रकात पाटिलांच्या पुणे महापालिका प्रशासनाला सूचना)

नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लोणावळ्यातील जलतरण तलावात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. जलतरण तलावातील दुर्घटना रोखण्यासाठी पोलिसांनी बंगले मालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लोणावळा, खंडाळा परिसरातील १०० बंगले मालक सहभागी झाले होते. पोलिसांनी दुर्घटना रोखण्यासाठी सूचना दिल्या होत्या.