वाढदिवसाचा केक. चॉकलेट आणि अंगठीचे फोटो आणि “खर्‍या प्रेमाचा शेवट नसतो कारण खर प्रेम कधीच संपत नाही,” अशी पोस्ट फेसबुकवर करून पुण्यात एका तरुणानं मरणाला कवटाळलं. फोटो आणि  लिहिलेल्या मजकूरावरून प्रेमप्रकरणातून त्यानं आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. समीर एकनाथ भसे (वय २५) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. समीरनं एक चिठ्ठीही लिहिली होती, त्यात आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, स्व:इच्छेने जीवन संपवत असल्याचे त्यानं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास समीर एका दुचाकीवरून इंदोरीच्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आला. तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता.. त्यानंतर मात्र काही क्षणातच त्याने पुलावरून थेट इंद्रायणी नदीत उडी घेतली. शेजारी काही अंतरावर काहीजण मासे पकडत होते, त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. परंतु, तोपर्यंत समीर हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी यांची माहिती पोलिसांना दिली. आत्महत्या करण्यापूर्वी समीरनं ‘खर्‍या प्रेमाचा शेवट नसतो कारण खर प्रेम कधीच संपत नाही….बदामाचे चिन्ह अशा आशयाचा मॅसेज फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून समीरने आपलं जीवन संपवलं. फेसबुकवर ‘ती’च्या आठवणीत समीरने चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील पोस्ट केला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth wrote about love on facebook and commits suicide in pune bmh
First published on: 23-12-2019 at 09:39 IST