Bhaji Recipe: फ्लावरची भाजी म्हटली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खायचा कंटाळा करतात. पण फ्लावरची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने खाणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवू शकता. दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा. कोणाला न आवडणारी फ्लावरची भाजी सुद्धा सगळे आवडीने खातील.

अंडा फ्लावरची रस्सा भाजी साहित्य

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
loksatta ulta chashma raj thackeray
उलटा चष्मा : असेही सेवा पुरवठादार..
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
  • १ अंड
  • १०० ग्रॅम फ्लॉवर
  • १/२ टोमॅटो
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या
  • २ आले चे तुकडे
  • १ कांदा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ३ खोबरे चे तुकडे
  • चवीनुसार मीठ घालावे
  • १ टी स्पून लाल तिखट
  • १/८ टीस्पून गरम मसाला
  • १/८ टीस्पून धणे पावडर
  • तेल
  • १/८ टीस्पून जीरे

अंडा फ्लावर ची रस्सा भाजी कृती

स्टेप १
प्रथम आपण फ्लावर चिरून स्वच्छ धुवून घ्यावे.

स्टेप २
मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, आले, लसूण पाकळ्या, खोबरे भाजून घ्यावे.

स्टेप ३
मग हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे मग त्यात लाल तिखट, मीठ, धणे पावडर, गरम मसाला, हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे

स्टेप ४
मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात जीरे घालावे ते तडतडली की त्यात फ्लावर घालून परतावे.

स्टेप ५
परतून झाल्यावर फ्लावर बाजूला सारून ठेवावा थोडे तेल घालून त्यात अंड घालून परतावे मग दोन्ही चमच्याने मिक्स करून त्यात वाटून घेतलेल्या मसाला घालून परतून घ्या.

हेही वाचा >> पोपटी मिक्स व्हेज भाजी; सर्वांना आवडणारी हिवाळा स्पेशल झटपट आणि मस्त रेसिपी

स्टेप ६
मग त्यात पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे

स्टेप ७
आपली अंड फ्लॉवरची रस्सा भाजी तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे