Chana Jor Garam Bhel: उन्हाळ्याचे दिवस संपून पावसाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात संध्याकाळी गरमागरम चहासोबत काहीतरी तिखट चटपटीत खावंसं वाटतं. अशा वेळी तुम्ही अवघ्या १० मिनिटांत चना जोर गरम भेळ करू शकता. ही भेळ खूप टेस्टी असण्याप्रमाणेच पौष्टिकही असते. चला तर मग जाणून घेऊ या चना जोर गरम भेळीची सोपी रेसिपी…

चना जोर गरम भेळ बनविण्यासाठी साहित्य:

१. ३-४ वाटी चना जोर गरम (बाजारात विकत मिळतात)
२. २ बारीक चिरलेले कांदे
३. ३ बारीक चिरलेले टोमॅटो
४. १/२ चमचा लाल तिखट
५. ३-४ चिरलेल्या मिरच्या
६. अर्ध्या लिंबाचा रस
७. बारीक चिरलेली कोथिंबीर
८. मीठ चवीनुसार

चना जोर गरम भेळ बनविण्याची कृती:

१. सर्वांत आधी एका मोठ्या बाउलमध्ये चना जोर गरम घ्या.

२. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची टाका.

३. हे सर्व घटक व्यवस्थित मिसळा. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घाला.

४. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करा.

हेही वाचा: उपवासासाठी खास बटाट्याच्या शिऱ्याची सोपी रेसिपी; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. आता शेवटी त्यावर कोथिंबीर घाला आणि गरमागरम चहासोबत चना जोर गरम भेळीचा आस्वाद घ्या.