Chicken Thecha : ठेचा आणि भाकर हे शब्द जरी उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. ठेचा आणि भाकर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ असेल. तुम्ही आजवर अनेक प्रकारचे ठेचे खाल्ले असतील पण तुम्ही कधी चिकन ठेचा खाल्ला का? नॉनव्हेज प्रेमींसाठी हा अस्सल चिकन ठेचा एक मेजवानी ठरू शकतो. चिकन ठेचा कसा बनवायचा, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल. एका व्हायरल व्हिडीओमध्ये चिकन ठेचा कसा बनवावा, याविषयी माहिती सांगितली आहे. (Chicken Thecha recipe how to make Maharashtrian Chicken Thecha in just 10 minuts video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला चिकन ठेचा कसा बनवावा, याविषयी सांगताना दिसते. ती म्हणते,
“आतापर्यंत तुम्ही भरपूर ठेचे खाल्ले असतील. पण हा चिकन ठेचा खाल तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. अशा गरमा गरम भाकरी किंवा पोळीबरोबर हा ठेचा अत्यंत चविष्ठ वाटतो.”

कसा करावा हा चिकन ठेचा?

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –
सुरुवातीला चार पाच हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर उखळमध्ये टाकून बारीक वाटून घ्या
आपला महाराष्ट्रीय ठेचा असतो त्याप्रमाणे तो ठेचायचा फक्त मीठ घालायला विसरू नका. त्यानंतर पाण्यात चिकन शिजवले आहे, त्याचे हाताने तुकडे करा आणि पुन्हा एकदा उखळमध्ये बारीक वाटून घ्या.
गॅसवर तवा ठेवा. त्या तव्यावर तेल गरम करा. त्यात जिरे घाला आणि बारीक वाटून घेतलेला ठेचा चांगला परतून घ्या.
चिकन ठेचा दहा मिनिटांमध्ये तयार होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

sm.katta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कधी न खाल्लेला जबरदस्त चिकन ठेचा” हा व्हिडीओ अडीच लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी आलं राव” तर एका युजरने लिहिलेय, “काकु मी केला हा ठेचा, मस्त झाला होता. छान आहे तुमची रेसिपी” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय परफेक्ट डिश आहे काकू छान” अनेक युजर्सनी व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.