हिवाळ्यात गरमागरम सूप पिण्याची इच्छा प्रत्येकाला होते. दररोज बाहेरचं स्टॉलवरील सूप पिणं शक्य नसतं आणि आरोग्यासाठी ते चांगलंही नसतं. पण, घरी बनवलेलं भाज्यांचं सूप प्यायला लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच कंटाळा करतात. मग आज आम्ही तुम्हाला एक हेल्दी सूप सांगणार आहोत; ज्यात पालक, बीट व टोमॅटोचा समावेश आहे. ते सूप अगदीच चविष्ट आणि लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पिण्यासाठी उत्तम आहे.
हेल्दी सूप बनवण्यासाठी साहित्य :
- पालक :- १ जुडी
- टोमॅटो :- ३
- बीट:- १
- मिठ
- तूप
- लसूण
- साखर
हेल्दी सूप बनवण्याची कृती :
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- पालक, टोमॅटो, बीट स्वच्छ धुऊन घ्या.
- त्यानंतर गॅस चालू करून, त्यावर कुकर ठेवून त्यात पालक, टोमॅटो व बीट घाला आणि तीन शिट्या देऊन उकडून घ्या.
- यादरम्यान गॅस फास्ट ठेवला तरी चालेल.
- तीन शिट्या झाल्यानंतर कुकरमधून पालक, टोमॅटो व बीट काढा आणि त्यांना थोडं गार करून, मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि गाळणीतून गाळून घ्या.
- नंतर गॅसवर कढई ठेवा. त्यात दोन चमचे तूप, लसणाचे बारीक तुकडे घालून फोडणी द्यावी.
- थोडी लसूण फ्राय झाल्यानंतर टोमॅटो, पालक, टोमॅटो, बीट यांचे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण कढईत घाला.
- सगळ्यात शेवटी चवीपुरते मीठ, चिमूटभर साखर व मिरी पूड घाला आणि उकळेपर्यंत गॅसवर ठेवा.
- अशा प्रकारे तुमचं पालक, टोमॅटो, बीटचं गरमागरम हेल्दी सूप तयार झालं.
लहान मुले भाज्या खायला कंटाळा करतात. त्यामुळे त्यांना पालक, टोमॅटो, बीटचं सूप प्यायला देणं अगदीच उत्तम ठरेल.