दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. घरघरामध्ये दिवाळीच्या फराळाची जय्यत तयारी सुरु आहे. चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळ्या, करंजी असे विविध पदार्थ दरवर्षी दिवाळीमध्ये आवर्जून तयार केले जातात. या दिवाळीमध्ये तुम्हाला काही हटके रेसिपी तयार करायची असेल तर ही भाजणी रोल ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. चकलीच्या पिठाची भाजणी वापरून तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. चवीला स्वादिष्ट आणि खुसखुशीत असे हे भाजणीचे रोल लहानांपासून मोठ्यांना नक्की आवडेल.

भाजणीचे रोल रेसिपी

भाजणीच्या रोलसाठी लागणारे साहित्य

चकलीचे भाजणीचे पीठ – चार वाट्या
हळद – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
कांदा लसून मसाला – अर्धा चमचा
लाल मिरची पावडर – अर्धा चमचा
मोहन तेल – अर्धा वाटी
पाणी – गरजेनुसार
तेल तळण्यासाठी

हेही वाचा – आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा

भाजणीचे रोल तयार करण्याची कृती

चकलीच्या भाजणीचे पीठ घ्या त्यामध्ये हळद, मीठ, कांदा लसून मसाला. लाल मिरची पावडर आणि मोहन तेल टाका. सर्व मिश्रण एकत्र करा आता त्यात पाणी टाकून ते मळून घ्या. आता तयार पिठाचे गोळे करून घ्या. आता पोळपाटाला तेल लावून घ्या आणि पोळीच्या आकाराची पाती लाटून घ्या आता चाकूने पोळीच्या मध्यबिंदूपासून काप करा जे त्रिकोणी असतील. आता बोटांनी हे काप बोटांनी गोल गोल गुंडाळल्यानंतर भाजणीचे रोल तयार होतील. आता गरम तेलामध्ये हे रोल टाकून मंद आचेवर सोनेरी होईल पर्यंत तळून घ्या.

हेही वाचा –Diwali Faral Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत बिस्किट शंकरपाळी! जाणून घ्या सोपी रेसिपी

हेही वाचा – Dairy Milk Chocolate Ice Cream: कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटपासून बनवा परफेक्ट आईस्क्रिम, हा सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चकली बनवून झाल्यानंतर भाजणीचे पिठ शिल्लक असेल तर हा पदार्थ तयार करून बघा. कुरकुरती आणि खुसखुशीत भाजणीचा रोल सर्वांना नक्की आवडेल.