साहित्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१०० ग्रॅम फरसबी, शतावरीच्या १०-१२ हिरव्या शेंगा, २ मोठे बटाटे उकडलेले, २ चमचे लिंबूरस, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, लेटय़ूस, ३-४ लसूण पाकळ्या ठेचलेल्या

ड्रेसिंगकरिता

१ चमचा मेयोनिज, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल सुक्या मिरचीची जाडसर पूड

कृती :

शतावरी आणि फरसबी धुऊन घ्या. त्या पाण्यात हलक्याशा वाफवून घ्या. आता त्यात बटाटे, लेटय़ूसची पाने घाला. ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणाच्या पाकळ्या आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण आता सॅलडमध्ये मिसळा.

सॅलड ड्रेसिंगकरिता मेयोनिज, सुकलेल्या लाल मिरचीची जाडसर पूड आणि कोथिंबीर एकत्र करा.

हे ड्रेसिंग सॅलडवर ओता, एकत्र करून खा.

  • कॅलरीज – १६०
  • कब्ज – १५
  • फॅट – ११
  • प्रोटीन – ४
  • सोडियम – १४
  • शुगर – २

nilesh@chefneel.com

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farasbi salad
First published on: 07-04-2018 at 02:30 IST