तुम्हाला हेल्दी राहायला आवडतं असेल किंवा तुम्हाला सुप प्यायला आवडत असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही सोपी रेसिपी आहे. ब्रोकली सूप. तुम्ही घरच्या घरी टॉमेटो सूप, कॉर्न सुप तयार केले असेल पण आता तुम्ही ब्रोकोलीचे सूप देखील करू शकता. ब्रोकली खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे हे तुम्हाला माहित आहे आता तुम्ही ब्रोकलीच्या सूपचा देखील आहारात समावेश करू शकता. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट तयार केली जाऊ शकते. ब्रोकली सुप हेल्दी तर आहेच पण चवीला देखील अप्रतिम आहे. चला तर मग जाणून घेऊ या सोपी रेसिपी
ब्रोकोली सूप रेसिपी
साहित्य – ब्रोकोली २५० ग्रॅम, लसूण पाकळ्या ७-८, १ चमचा लोणी, दूध १ कप, भिजवलेले बदाम ७-८, मिरपूड
कृती – गरम पॅनमध्ये बारीक चिरलेला लसूण घाला. त्यावर चिरलेली ब्रोकोली, दूध घालून एक वाफ आणा. मीठ, मिरपूड व भिजवलेले बदाम घाला. किंचीत गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बाऊलमध्ये गरम गरम वाढा.