crispy karela : कारले शब्द जरी उच्चारला तरी तोंडी कडू नाव लगेच येतं. कारले ही जरी पौष्टीक भाजी असली तरी कडू असल्यामुळे अनेकजण खायला टाळतात. लहान मुले तर कारल्याची भाजी खायला थेट ‘नाही’ म्हणतात पण जर तुम्ही अशी कुरकुरीत कारले केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण कारले आवडीने खातील. कुरकुरीत कारले कशी करायची? या काही खास टीप्स फॉलो करा.

  • सुकं खोबरं, हरभरा डाळ, उडीद डाळ लाल मिरची, तीळ, आणि जिरे हे सर्व साहित्य भाजून घ्यावेत आणि वाटून घ्यावेत.
  • कारल्याची फक्त देठं काढून कारल्याचे एकसारखे काप करावेत .
  • उकळत्या पाण्यात चिमुटभर हळद व चिमुटभर मीठ घालून त्यात कारल्याचे तुकडे टाकावेत .
  • पाच मिनिटं उकळून घ्यावेत .
  • नंतर चाळणीत ओतून त्यावर लगेच गार पाणी ओतावं आणि तुकडे मुठीत दाबून पाणी काढून टाकावं .
  • ते सर्व तुकडे कागदावर दहा मिनिटं पसरावेत .

हेही वाचा : झणझणीत मसालेदार बासमती पुलाव कसा बनवायचा? ही सोपी रेसिपी नोट करा

  • एक ते दीड डाव तेल गरम करून कारल्याचे तुकडे चुरचुरीत-कुरकुरीत तळून काढावेत .
  • बारीक चिरलेला कांदा त्याच तेलात परतावा .
  • दुसऱ्या पॅनमध्ये गूळ (आवडीप्रमाणे) घ्यावा व दीड वाटी पाणी घालून गरम करावं .
  • लक्षात ठेवा, पाक करू नये .
  • गूळ विरघळला की त्यात तिखट , मीठ , हळद , हिंग , आमचूर , जिरेपूड , कोथिंबीर आणि वरील मसाला याचं एकत्रित मिश्रण करावं.
  • त्यात कारली आणि कांदा टाकावा
  • सर्व मसाला कारल्याच्या फोडींना लागला पाहिजे तरच कारले टेस्टी वाटणार.