How To Make Soft Paneer: पनीर खायला आवडत नाही असे क्वचितच कोणी असेल. पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असतेच पण चवीला देखील कमाल असते. म्हणूनच शाकाहारी पदार्थांमध्ये पनीरचा वापर कित्येक प्रकारे केला जातो. तुम्ही यापासून सॅलड, पालक पनीर, कढाई पनीर, साधी पनीरची भाजी पासून शाही पनीर, चिली पनीर …असे कित्येक पदार्थ तयार करू शकता. एवढंच नव्हे तर पनीर तयार करणे देखील फार सोपे आहे. फार कमी वेळात पनीर तयार करता येते. तुम्हाला घाई गडबड असेल काहीतरी चांगली भाजी तयार करायची असेल तर पनीरची भाजी तयार करू शकता. पण कित्येकांची अशी तक्रार असते की घरी पनीर तयार करताना तळल्यानंतर कडक होते, ते रेस्टॉरंटसारखे मऊ राहत नाही. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत जे पनीर तळल्यानंतरही मऊ बनवू शकतात.

तळल्यानंतरही पनीर मऊ राहण्यासाठी सोपे उपाय

थंड पाण्याचा वापर करा
जेव्हा तुम्ही पनीर तळता तेव्हा गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि जवळ थंड पाण्याचे भांडे ठेवा. आता पनीरचे तुकडे कढईत टाकून तळून घ्या आणि हलका तपकिरी रंग दिसू लागला की लगेच काढून पाण्यात टाका. ५ ते १० मिनिटांसाठी पाण्यात राहू द्या. जेव्हा भाजीमध्ये टाकण्याआधी ते प्लेटमध्ये काढून घ्या आणि पनीर तळल्यानंतरही मऊ राहील.

हेही वाचा – तुम्ही कधी व्हेजिटेरिअन फिश फ्राय खाल्ला आहे का? नाव ऐकून गोंधळून जाऊ नका, आधी संपूर्ण रेसिपी वाचा

गरम पाणी वापरा
तळल्यानंतर पनीर मऊ रहावे यासाठी तुम्ही दुसरा पर्याय वापरू शकता. त्यासाठी तुम्ही तुम्ही पनीर तळून घ्या. गरम पाण्याच्या भांडे ठेवा आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाका. आता पनीर तळल्यानंतर लगेच गरम पाण्यात टाकून झाकून ठेवा. भाजी तयार करताना पाणी गाळून पनीर वापरा.

कच्चे पनीर पाण्याच ठेवा
जर कित्येक दिवसांपासून पनीर फ्रिजमध्ये ठेवले असेल तर तळल्यानंतर ते कडक होऊ शकते. त्यासाठी पनीरचे कापून तुकडे करा आणि साध्या पाण्यात अर्धा तास ठेवा. आता तळून घ्या आणि भाजीत वापरा. पनीर कडक होणार नाही.

हेही वाचा – काकडीचे धोंडस! नावावर जाऊ नका, फक्त एकदा खाऊन पाहा, मालवण भागातील हटके रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताजे आणि चांगल्या गुणवत्तेच पनीर घ्या
नेहमी हे लक्षात ठेवा की पनीर ताजे आणि चांगल्या क्वालिटीचे घ्या. ताज्या पनीरची चव जास्त चांगली असते आणि तळल्यानंतर ते मऊ देखील होते. खराब गुणवत्ता असलेले पनीर तळल्यानंतर कडक होते.