उन्हाळ्यात लोणचे, पापड, कुरडई ,पापड्या असे अनेक वाळवणाचे पदार्थ आपल्याकडे बनवले जातात. जेवणासह तोंडी लावताना हे आवडीने खाल्ले जातात. असाच एक पदार्थ म्हणजे झणझणीत सांडगी मिरची. सांडगी मिरचीला वाळवणाची मिरची देखील म्हणतात. सांडगी मिरची तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता. ही मिरची मसाला लावून उन्हात वाळवली जाते आणि जेव्हा हवी तेव्हा तुम्ही तळून जेवणासह तोंडी लावू शकता. तुम्ही कधी सांडगी मिरची खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पाहा. ही घ्या रेसिपी
सांडगी मिरची रेसिपी

सांडगी मिरचीसाहित्य

मीठ
हिंग
हळद
मिरची (उभी आणि जाड- भज्यासाठी वापरली जाते)
तेल

हेही वाचा – उन्हाळ्यात प्या थंडगार जलजीरा! घरीच बनवा ३ महिने टिकेल अशी जलजीरा पावडर, नोट करा रेसिपी

सांडगी मिरची कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला मिरच्या धूवून घ्या त्यानंतर चाकूने मिरचीला उभे काप करा. एका प्लेटमध्ये मीठ, हिंग, हळद एकत्र करा. कापलेल्या मिरचीमध्ये ही पावडर भरून ठेवा. मिरचीला सुटलेले पाणी काढून टाका आणि आता या मिरच्या दुसऱ्या दिवसी सकाळी ४-५ तास उन्हात वाळवा. हवाबंद डब्यात भरून ठेवा. त्यानंतर मिरची तेलात तळून घ्या. सांडगी मिरची तयार आहे. जेवताना तोंडी लवाण्यासाठी सांडगी मिरची वापरा. चविष्ट सांडगी मिरचीचा आस्वाद घ्या