नावात काय असे असे कोणीतरी का म्हटले असावे याचा विचार केला आहे का कधी? कारण काही गोष्टी किंवा व्यक्ती त्यांची नावापेक्षा अत्यंत वेगळ्या असतात. त्यांची स्वत:चे असे एक खास वैशिष्ट्य असते त्यामुळे नाव काहीही असलं तरी काय फरक पडत नाही. आता हेच बघा ना, आपल्याकडे असे किती पदार्थ आहेत ज्यांची नाव विचित्र असतात तरी ती आपण आवडीने खातो ना. घोसवळ्याची भजी, अळूचे फदफदे, शेंगोळे इं. नाव जरी गोंडस नसले तरी या पदार्थांची चव तुम्ही चाखली असेल तर नावाकडे दुर्लक्ष करून ताव मारला असेलच ना. तसंच या काकडीचे धोंडशाचही आहे. काकडीचे धोंडस हे नाव ऐकून तुम्हाला कसंतरी वाटत असेल तरी त्याची चव मात्र कायम जिभेवर रेंगाळणारी आहे. मालवण भागात लोकप्रिय असलेला हा पदार्थ कसा करायचा, ते आज शिकूया.

काकडीचे धोंडस करण्याची रेसिपी

काकडीचे धोंडस करण्यासाठी लागणारे साहित्य
इडली रवा २ वाट्या, जाड मोठ्या काकड्या किसून ४ वाट्या ( पाणी काढू नये), ओलं खोबर अर्धी वाटी, गुळ चिरून दीड वाट्या, तुल, वेलची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काकडीचे धोंडस करण्याची कृती
कढईत थोडसे तूप घालून त्यावर इडलीचा रवा छान गुलाबीसर भाजून घ्या. ताटात पसरून ठेवा. याच कढईत किसलेली काकडी घालून मंद आचेवर शिजवा. पाणी संपूर्ण आटता कामा नये, काकडी साधारण पारदर्शक झाली की त्यात भाजलेला रवा घाला आणि ढवळत राहा. गूळ घाला आणि परत शिजवा. मिश्रणाचा गोळा व्हायला हवा. गुळ घातल्यावर मिश्रण पातळ झाले तरी घाबरू नका. ते हळू हळू घट्ट होते. वेलची, किंचित मीठ, ओलं खोबर घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. तूप लावलेल्या भाड्यांत ओतून इडली पात्रात ५ ते ७ मिनिटे वाफवा. त्यात आवडत असल्यास आणि उपलब्ध असल्यास हळदीची पाने घालतात. हा एक प्रकारचा काकडीचा केक आहे.