पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये कढईतून गरमागरम काढलेली भजी, वडे किंवा इतर तळणीचे कुरकुरीत पदार्थ, चहासोबत खायला फारच मजा येते. परंतु, हे पदार्थ घरी बनवल्यानंतर फारकाळ तसेच खमंग राहत नाहीत. सर्व तळणीचे पदार्थ लवकर गार होऊन ते मऊ पडतात. त्यामुळे त्याच्यातली मजा निघून जाते. पण, आता याची काळजी करू नका; कारण असे पदार्थ मऊ न होऊ देता, त्यांचा कुरकुरीतपणा जाणार नाही यासाठी काय करू शकतो, याच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

तळणीचे पदार्थ मऊ का बरं पडतात?

How To Make Raw Banana Chivda
Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या
Patients, water borne diseases, Nagpur,
नागपूर : सावधान! जलजन्य आजाराचे रुग्ण वाढले, जाणून घ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी असलेले नियम
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
World Health Organization
मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करताय? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणतेय जाणून घ्या…
How to Reduce Underarms Fats Exercise
काखेजवळील फॅट्स, दंडाखालील चरबी कमी करण्याचे सोपे व्यायाम वाचा; डॉ. मेहतांचा सल्ला वापरून स्लिव्हलेस घाला बिनधास्त
weight gain and exercise
झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…
have you been you using toothpicks then read health experts recommendations
दातांमधील अन्नकण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करणे थांबवा! तज्ज्ञांनी सुचविलेले ‘हे’ पर्याय पाहा वापरून
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

पदार्थांच्या टेक्श्चरच्या अभ्यासासंबंधित एका अहवालानुसार [The Journal of Texture Studies] असे लक्षात येते की, तळणीच्या पदार्थांचे बाहेरचे आवरण हे कोरड्या घटकांचे असून आतील पदार्थांमध्ये ओलावा असतो. म्हणूनच तळलेले पदार्थ खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. परंतु, आतमधील असलेल्या भागातील ओलावा हा तळलेल्या पदार्थांच्या बाह्य आवरणात शोषला जातो; परिणामी कुरकुरीत पदार्थ लगेच मऊ होतात. आता असे होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते पाहा.

हेही वाचा : हिवाळ्यात सतत आळस येतोय? ‘हे’ असू शकतं कारण; पाहा या ५ रेसिपी ठेवतील तुम्हाला उत्साही…

भजी, वडे किंवा तळणीचे पदार्थ अधिक काळ कुरकुरीत राहावे यासाठी काय करावे?

१. जाळीचा वापर करावा

कोणताही पदार्थ एअरफ्राय केल्यानंतर किंवा कढईतून तळून काढल्यानंतर त्याला मोठ्या जाळीच्या पातेल्यात किंवा अशा गोष्टीवर ठेवावे जिथून पदार्थाची वाफ सगळीकडून बाहेर जाऊ शकेल. असे केल्याने तळलेल्या पदार्थातील अतिरिक्त ओलावा नाहीसा होण्यास मदत होते.

२. पदार्थ ओव्हनमध्ये गरम करताना

एखादा पदार्थ आपण पुन्हा ओव्हनमध्ये गरम करत असतो तेव्हा तो गरम तर होतो, परंतु त्याला मऊपणा येतो. असे न होण्यासाठी ओव्हनमध्ये स्वयंपाकघरात पदार्थ गार करण्यासाठी वापरले जाणारे वायर रॅक ठेऊन त्यावर १५ मिनिटांसाठी पदार्थ बेक करून घ्यावा. यामुळे पदार्थ आहे तसाच राहण्यास मदत होते.

३. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करणे टाळा

मायक्रोवेव्हमध्ये एखादा पदार्थ पुन्हा गरम करण्यास ठेवला तर पदार्थांमधील ओलाव्याचे वाफेत रूपांतर होऊन पदार्थामधील ओलावा थोड्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे कधीही तळलेली गोष्ट पुन्हा गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करू नका. त्याऐवजी ओव्हन वापरावा.

४. ग्रेव्हीचा वापर टाळावा

तुम्ही एखादा कुरकुरीत पदार्थ बनवणार असल्यास त्यामध्ये ग्रेव्ही किंवा कोणत्याही प्रकारचा सॉस घालू नका. परंतु, पदार्थामध्ये ग्रेव्ही/सॉस घालायचे असल्यास अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबावे. पदार्थ खायला घेताना ग्रेव्ही घालून घ्यावी. यामुळे तळलेले पदार्थ कुरकुरीत राहण्यास मदत होते.

५. तळणीचे पदार्थ भरून ठेवताना काळजी घ्यावी.

ऑफिस किंवा लहान मुलांच्या डब्यामध्ये असे पदार्थ देताना ते योग्य पद्धतीने भरावे. त्यासाठी तळणीच्या पदार्थांना, ओलावा शोषून घेतील अशा पेपरमध्ये किंवा टिशू पेपरमध्ये गुंडाळून घेऊन हवाबंद डब्यात भरावे. सोबत सॉस द्यायचा असल्यास तो एका वेगळ्या डब्यात भरून द्यावा.