Bread Yummy Recipe: अनेकदा नाश्त्यासाठी आणलेले ब्रेड उरतात, अशावेळी त्यांचं काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच. अशावेळी तुम्ही त्या ब्रेडपासून वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता. आत्तापर्यंत अनेकदा तुम्ही उरलेल्या ब्रेडपासून गुलाबजाम, उपमा असं काहीना काही बनवलं असेलच. पण, आज आम्ही तुम्हाला फोडणीचा टेस्टी ब्रेड कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घेऊया साहित्य आणि कृती.

साहित्य :

१. उरलेले ब्रेड
२. १ चिरलेला बारीक कांदा
३. १ चमचा लाल तिखट किंवा ४-५ मिरच्या
४. १/२ चमचा जिरे
५. १/२ चमचा मोहरी
६. चिमूटभर हिंग
७. १/४ चमचा हळद
८. कोथिंबीर
९. चवीनुसार मीठ
१०. तेल आवश्यकतेनुसार

drug smuggler Nagpur
उपराजधानीत ड्रग्स तस्करांचा पुन्हा सुळसुळाट, कुरिअरने मागविले…
Healthy Midnight Snacks Option
रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या
Gut, Stomach Infection Home Remedies
अल्सरचा त्रास, पोटही बिघडतंय? जिरं, ओवा व ‘या’ मसाल्याचा वापर देईल चुटकीसरशी आराम; खाण्याची योग्य पद्धत वाचा
How to save people who are swept away by floods
लोणावळ्यासारखी दुर्घटना तुमच्याबरोबर घडली तर काय कराल? पुरात अडकल्यास फक्त ‘ही’ एक कृती मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढेल, पाहा VIDEO
heart-wrenching description of a hungry child's reaction to a poster showing a plate of food.
“भूक किती वाईट असते ना!” पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटाच्या पोस्टरला हात लावून चिमुकल्याने भरलं पोट, हृदयद्रावक Video Viral
VIDEO Stray Cow Chases Couple On Bike, Drags Woman On Road
“आ बैल मुझे मार!”, चिडलेल्या गायीसमोर बाईक थांबवून व्यक्तीने केली मोठी चूक, पुढे जे घडलं…..पाहा थरारक Viral Video
Woman finds dead mouse in Hershey's chocolate syrup
धक्कादायक! झेप्टोवरुन मागवलेल्या ‘हर्शी चॉकलेट सिरप’च्या सिलबंद बाटलीत आढळला मृत उंदीर, व्हिडीओ व्हायरल
Jodhpur news when the girl left him after becoming ias her lover wrote a book trending
ठुकरा के मेरा प्यार…आयएएस अधिकारी होताच प्रेयसी सोडून गेली; प्रेमभंग झाल्यानं प्रियकरानं काय केलं पाहाच

कृती :

हेही वाचा : उडीद आणि तांदळाचे नाही, यंदा बनवा उन्हाळा स्पेशल ‘नाचणीचे पापड’; लिहून घ्या साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी उरलेले ब्रेड हाताने मोठेमोठे कुस्करून घ्या. त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घाला.

२. आता एका गरम कढईत तेल ओता व त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, चिरलेला कांदा आणि लाल तिखट किंवा मिरच्या घालून व्यवस्थित परतून घ्या.

३. कांदा जरा लालसर झाल्यावर त्यात कुस्करलेला ब्रेड घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

४. नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून एक वाफ काढून घ्या.

५. तयार गरमागरम फोडणीचा ब्रेड तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.