Soyabean Nuggets Recipe: सकाळी मुलांसाठी डबा बनवण्यासाठी रोज नवनवीन पौष्टिक पदार्थ कोणते बनवायचे असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही सोयाबीन नगेट्स ची ही सोपी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती..
सोयाबीन नगेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप सोयाबीन चंक्स
- २ चमचे रवा
- २ चमचे बेसन
- २ चमचे आलं-लसूण पेस्ट
- ४-५ हिरव्या मिरच्या
- अर्धा बारीक चमचा हळद
- १ चमचा गरम मसाला –
- आवश्यकतेनुसार गरम पाणी
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
सोयाबीन नगेट्स बनवण्याची कृती:
- सर्वप्रथम सोयाबीनचे तुकडे गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवून घ्या.
- त्यानंतर सोयाबीनमधील पाणी गाळून सोयाबीनचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- वाटलेल्या सोयाबीनमध्ये रवा, बेसन, आलं-लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, गरम मसाला आणि चवीपूरते मीठ टाकून एकजीव करा.
- मिश्रण तयार झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करून
कढईत तेल गरम झाल्यावर त्या सोयाबीन नगेट्स लालसर होईपर्यत तळून घ्या. - अशा पद्धतीने गरमागरम सोया नगेट्स टोमॅटो सॉसबरोबर आस्वाद घ्या.