Weight loss Food: वजन कमी करण्यासाठी लोक नाश्तामध्ये स्प्राउट्स, फळे आणि स्मूदी यांसारख्या पदार्थांचे सेवन करतात. नाश्ता हे तुमच्या संपूर्ण दिवसातील सर्वात महत्वाचे जेवण आहे. तुमचा नाश्ता जितका चांगला असेल तितकी तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल. म्हणूनच नाश्ता हा राजा सारखा करावा असे म्हणतात. जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि आरोग्यदायी नाश्त्या खाण्यासाठी पर्याय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी हेल्दी टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत. जे तुम्ही सहज करु शकता. ओट्स वजन कमी करण्यास मदत करते, म्हणून आज आम्ही तुम्हाला ओट्स थेपला तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत जी तुम्हाला नक्कीच आवडेल.

ओट्स थेपला साहित्य

  • साधे ओट्स – १ कप
  • बेसन – अर्धी वाटी
  • गाजर – २ बारीक चिरून
  • कोबी – बारीक चिरून
  • कांदा – १ बारीक चिरून
  • सिमला मिरची – अर्धी
  • धणे – १ टीस्पून
  • हिरवी मिरची – १-२
  • आले-लसूण पेस्ट – अर्धा टीस्पून

ओट्स थेपला रेसिपी

  • ओट्स थेपला करण्यासाठी प्रथम ओट्स मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करा.
  • आता एका भांड्यात ओट्स, बेसन घालून नीट मिक्स करून घ्या.
  • यानंतर सर्व भाज्या आणि आले-लसूण पेस्ट घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात एक चमचा तेल, मीठ आणि पाणी घालून चांगले मिक्स करून पीठ मळून घ्या.
  • आता पिठाचे छोटे गोळे घेऊन पातळ लाटून घ्या.
  • तवा गरम करून त्यामध्ये टाका आणि दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या.
  • तुमचा चविष्ट आणि हेल्दी ओट्स थेपला तयार आहे.
  • तुम्ही चटणीसोबत गरमागरम खा.