Masala Pav Recipe : पाव किंवा ब्रेडचे तुम्ही अनेक पदार्थ खाल्ले असतील. पावभाजी, वडापाव, ब्रेड सँडविच, ब्रेड उपमा इत्यादी. तुम्ही कधी मसाला पाव खाल्ला आहे का? हो मसाला पाव. चवीला अप्रतिम वाटतो. ब्रेडच्या तुकड्यांपासून बनवला जाणारा सर्वात सोपी आणि लवकरात लवकर होणारा पदार्थ आहे. नाश्त्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला घाई असेल आणि झटपट काही करी खायचं बनवायचं असेल तर मसाला पाव आवर्जून बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडू शकतो असा हा पदार्थ आहे. तुम्हाला वाटेल मसाला पाव कसा बनवायचा, तर त्यासाठी तुम्हाला ही सोपी रेसिपी जाणून घ्यावी लागेल. मसाला पाव इतका चविष्ठ आहे की तुम्ही एकदा हा पदार्थ खाल्ला की पुन्हा पुन्हा खाल.

साहित्य

ब्रेडचे तुकडे
तेल
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेले टोमॅटो
बारीक चिरलेली ढोबळी मिरची
तूप
जिरे
पावभजी मसाला
लाल तिखट
मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा : शेवग्याच्या शेंगाचे असे बनवा टेस्टी सूप, पौष्टिक रेसिपी लगेच नोट करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

सुरूवातीला ब्रेडचे लहान लहान काप करुन घ्या.
त्यानंतर कढई गॅसवर ठेवा
कढईत तेल गरम करा.
त्यानंतर त्यात जिरे टाका
त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका आणि चांगले परतून घ्या
त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो त्यात टाका.
त्यानंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची त्यात घाला आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे सर्व नीट परतून घ्या.
त्यानंतर त्यात तूप घाला.
त्यानंतर त्यात पाव भाजी मसाला घाला. याची चव मसाला पावमध्ये खूप छान पद्धतीने उतरते.
त्यात चवीनुसार लाल तिखट, मीठ घाला आणि एकत्रित करा.
दोन तीन मिनिटे मसाला छान परतून घ्या.
त्यानंतर अगदी थोडे पाणी त्यात घाला आणि दोन ते तीन मिनिटे हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा.
मसाला शिजवून झाला की त्यात ब्रेडचे तुकडे त्यात टाका
चार ते पाच मिनिटे चांगले परतून घ्या.
शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
तुमचा गरमा गरम मसाला पाव तयार होईल.
तुम्ही हा मसाला पाव सर्व्ह करू शकता.