Sweet potato kachori: उपवास म्हटले की, अनेकदा आपण साबुदाण्याची खिचडी, वरईचा भात हे साधे सोपे पदार्थ बनवतो. पण, प्रत्येक वेळी उपवासाला हे पदार्थ खायला कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही रताळ्याची कचोरी ट्राय करण्याचा नक्कीच विचार करू शकता. रताळ्यामध्ये पोटॅशियम, फायबर, जीवनसत्त्व अ व ब यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

उपवासाची कचोरी (सारणाचे साहित्य)

१. २ वाटी किसलेले खोबरे
२. ५-६ हिरव्या मिरच्या
३. १/२ चमचा तूप
४. ६० ग्रॅम मनुके
५. मीठ चवीनुसार
६. साखर चवीनुसार

कचोरीच्या आवरणासाठीचे साहित्य

१. ३५० ग्रॅम रताळी
२. २ मोठे बटाटे
३. २ वाटी वरईचे पीठ
४. तळण्यासाठी तूप आवश्यकतेनुसार
५. मीठ चवीनुसार

कृती :

हेही वाचा : ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्स पराठ्याची टेस्टी सोपी रेसिपी

१. सर्वांत आधी रताळी आणि बटाटे उकडून घ्या. त्यानंतर ते कुस्करून बारीक करून, त्यात थोडे मीठ घाला.

२. त्यानंतर १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून, नंतर ते गॅसवरून खाली उतरवून घ्या.

३. आता त्यात किसलेले खोबरे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मनुके, मीठ आणि चवीनुसार साखर घालून सारण तयार करावे.

४. त्यानंतर रताळे आणि बटाट्याच्या मिश्रणाची पारी करून, त्यात थोडे सारण करून कचोर्‍या तयार कराव्यात.

५. आता त्या कचोऱ्या वरईच्या तांदळाच्या पिठात घालून, तुपामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. तयार गरमागरम उपवासाची कचोरी खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खायला द्यावी.