Sukha bombil rassa bhaji recipe in marathi: बोंबील बाजारांमध्ये अगदी सहजपणे मिळत असतात. बोंबील हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात. बोंबील मध्ये आयरन चे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मिळत असते. यामुळे शरीरामध्ये असलेल्या मांसपेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे याच्या सेवनामुळे मेंदू देखील तल्लख होत असतो.कंप्यूटर मोबाईल समोर तासन्तास काम केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर डोळे खूपच थकून जात असतात. अशावेळी बोंबीलचे सेवन केल्यास डोळ्याचा आलेला थकवा नश्ट होत असतो. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यासाठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सुका बोंबील रस्सा रेसिपी

प्रेशर कुकरमध्ये बनवा सुका बोंबील रस्सा भाजी साहित्य

Carrot Smoothie Recipe In Marathi
Carrot Smoothie: मुले गाजर खात नसतील तर बनवा स्मूदी, दृष्टी वाढण्यास होईल मदत
Are you sleeping after 1 am? It can affect your mental health
Healthy sleep: तुम्हीही रात्री १ वाजता झोपता का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम
Bike Accident Shocking Video Goes Viral On The Internet
VIDEO: सुसाट गाड्यांमध्ये उलट्या दिशेने आला अन् एका मागोमाग अपघातांचा थरार; मदत करायची सोडून केलं असं काही…
viagra tablet for dimensia
लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?
Womens health How appropriate to take period pills
स्त्री आरोग्य : पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेणं कितपत योग्य?
Car bike tyre safety tips for monsoon
Monsoon Bike Riding: मान्सूनमध्ये लाँग ड्राईव्हला जाताय? मग आधी ‘हे’ वाचाच; प्रवास होईल सुखकर
beetroot-pineapple-lemon juice remedy for iron deficiency
रक्तातील लोह वाढवण्यासाठी ‘बीट, अननस अन् लिंबाचा रस ठरेल का फायदेशीर? काय सांगतात तज्ज्ञ?
How to use onion on hair
केसांमधील कोंड्याच्या समस्येमुळे वैतागला आहात का? अशा पद्धतीने केसांना लावा कांद्याचा रस, पाहा कमाल

१. १५-२० सुके बोंबील
२. २ शेगवाच्या शेंगा
३. २ कांदे
४. २ टोमॅटो
५. २ इंच आलं
६. ७-८ लसूण पाकळ्या
७. ६-७ आमसुलं
८. १ दांडी कडीपत्ता
९. २ वांगी
१०. १ बटाटा
११. आवश्यकतेनुसार तेल
१२. चवीनुसार मीठ
१३. १ टीस्पून हळद
१४. १ टेबलस्पून वाडवळी मसाला
१५. कुकिंग सूचना

प्रेशर कुकरमध्ये बनवा सुका बोंबील रस्सा भाजी कृती

१. प्रथम बोंबलाचे साधारण दोन इंचाचे तुकडे करून, धुवुन पाण्यात भिजत घाला. मोठे बोंबील वापरणार असाल तर कॉन्टिटी थोडी कमी करा. आले, लसूण, कढीपत्ता, आमसूल आणि टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. कांदा बारीक चिरा. कोकमा ऐवजी चिंचेचा कोळ ही वापरू शकता.

२. कुकर मध्ये तेल गरम करून त्यात भिजवलेले बोंबील दोन मिनिटे परतून घ्या. मग त्यात कांदा घालून कांदा थोडासा परतल्यावर त्यात मीठ, हळद आणि वाडवळी मसाला घाला.

३. वाडवळी मसाला नसेल तर घरगुती वापरातील मिक्स मसाला वापरा… पण वाडवळी किंवा आगरी मसाला वगैरे असेल तर भाजी जास्त चविष्ट बनते…

४. मसाले थोडे परतल्यावर त्यात वाटण घाला. टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की त्यात वांग, शेवग्याची शेंग आणि बटाटा घाला…

५. सर्व व्यवस्थित मिसळून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि दोन शिट्ट्या घ्या.

हेही वाचा >> बोंबील रोल्स स्टफ्ड विथ कोलंबी; घरच्या घरी करा रेस्टॉरंट स्टाईल बेत

६. आपली वांग बटाटा शेवग्याची शेंग घालून सुक्या बोंबलाची भाजी तयार.

७. या भाजी जोडीला गरम गरम भात किंवा तांदळाची ओतोलीच कॉम्बिनेशन मिळाला की दोन काय चार घास जास्त जातील…