हिवाळ्यात तुम्ही रोज मुळा खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते. हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. चला तर मग पाहुयात हिवाळ्यात मुळ्याची मुळ्याची किसून भाजी आणि कोशिंबीर कृती कशी तयार करायची? याची सोपी रेसिपी

मुळ्याची किसून भाजी आणि कोशिंबीर साहित्य

  • दोन मध्यम मुळे पाल्या सकट शक्यतो कोवळे असावेत
  • तीन हिरव्या मिरच्या
  • भिजवलेली मुग डाळ अथवा हरबरा डाळ
  • फोडणीचे साहित्य मोहरी हिंग हळद चवीनुसार मीठ
  • साखर अर्धी वाटी दही
  • बारीक चिरलेली कोथिबीर ओले खोबरे

मुळ्याची किसून भाजी आणि कोशिंबीर कृती

प्रथम दोन्ही मुळे कीसून घ्यावेत. सोबत मुळ्याचा पाला पण बारीक चिरावा, किसातील पाव भाग कोशिंबिरी साठी ठेवावा

कढईत तेल तापवून हिंग मोहरीची फोडणी करावी, फोडणीत दोन मिरच्या मध्ये कापून टाकाव्या. त्यानंतर भिजवलेली मूग डाळ घालून परतावे व दोन तीन मिनिटे झाकण ठेवावे

नंतर किसलेला मुळा व चिरलेला पाला घालून थोडे परतून परत झाकण ठेवावे, पाच मिनीटात भाजी शिजते. नंतर हळद, मीठ आवडत असल्यास साखर घालून परत सारखी करून घ्यावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व ओले खोबरे घालावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हींग मोहरीच्या फोडणीत एक मिरची परतून घ्यावी किंचित हळद घालावी. ही फोडणी मुळ्याच्या किसात घालून अर्धी वाटी दही, मीठ साखर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे भरीत चांगले कालवून घ्यावे. हे भरीत अतीशय चविष्ट होते