उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होत असल्याने वेगवेगळ्या पेयांद्वारे शरीरातील पाणी टिकवून ठेवता येते. त्यासाठी उसाचा रस, लिंबाचे, कोकमाचे सरबत, पन्हे, नीरा, चिंचेचे पन्हे, जलजिरा असे अनेक नैसर्गिक पदार्थ वापरून केलेले पर्याय उपलब्ध आहेत.

जलजिरा
उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पेय घरच्या घरी बनवता येणारे आणि विविध फायदे देणारे आहे. जिरा पूड, आले, काळे मीठ, पुदिना, आमचूर पूड इत्यादी अनेक पदार्थ कमी-जास्त प्रमाणात त्यात वापरून जलजिरा बनवले जाते. जलजिऱ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थानुसार त्याचे गुणधर्म बदलत जातात. जलजिऱ्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच परंतु शरीरातली उष्णताही कमी होते. पचनाच्या तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा!

Gukesh Youngest Ever To Win Candidates Tournament
लहानाचे मोठेपण..
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

कोकम सरबत
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात वापरला जाणारा आणखी एक पदार्थ म्हणजे कोकम. चवीला उत्तम आणि बरेच आरोग्याचे फायदे देणारा. कोकम सरबत आणि विविध डाळी, भाज्यांमध्ये कोकमचा वापर करता येऊ शकतो. कोकम किंवा कोकम सरबतामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच पण त्याचबरोबर पित्ताच्या सर्व तक्रारी दूर होतात. तसेच अ‍ॅलर्जी झाल्यास कोकम फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे हायड्रॉक्सिसिट्रिक अ‍ॅसिड या द्रव्यामुळे चरबी शरीरात साठण्यास अटकाव होत असल्याने वजन आटोक्यात राहते. बाजारामध्ये जे कोकम सरबत मिळते त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजनाला अनुसरून सरबत घेण्याची पद्धत बदलावी किंवा घरच्या घरी अगळ आणूनही सरबत करता येते.

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com