१९७० नंतर उर्दू शायरांची जी नवी पिढी सृजनरत झाली त्यातला एक महत्त्वपूर्ण शायर मुंबईचा अब्दुल अहद ‘साज’ मानला जातो. ‘साज’ फार संवेदनशील आहे. परिचित-अपरिचित कवी- कलाकार यांच्या मरणावरील त्यांच्या कविता दिङ्मूढ करून उदास करणाऱ्या आहेत. ‘जिन्दगी की बंद सीपी खुल रही है..’ आदी शेर त्यात भरच टाकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्याच नव्हे तर भारतील उर्दू साहित्य वर्तुळात एक सुसंस्कृत शायर म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत शांत, धीम्या स्वरात तो ग़ज़ल, नज्म, गीत, दोहे, रुबाइया, माहिये प्रभावीपणे पेश करतो. त्याची शायरी पारंपरिक शायरीचे आधुनिक पण ‘लाऊड’ न होणारी शायरी आहे. अतीत व वर्तमानाच्या संदर्भात तो आपले जीवनानुभव शब्दबद्ध करतो. हा अष्टपलू शायर अब्दुल अहद ‘साज’ होय. १९७० नंतर उर्दू शायरांची जी नवी पिढी सृजनरत झाली त्यातला एक महत्त्वपूर्ण शायर मुंबईचा अब्दुल अहद ‘साज’ मानला जातो. त्यांचे शेर नंतर पेश तर करनेच पण तत्पूर्वी त्यांच्या शेरांचे काही मिसरे मला भावले ते असे-
जिसकी खोज में खो जाओ,
तो मुम्किन है पा जाना भी
राह खुद राह की दीवार हुई जाती है
तेरे बिना भी जिन्दगी, तेरी कसम गुजर गई
इक नींद है कि मुझको जगाती है बारबार
जिन्दगी की बंद *सीपी खुल रही है
या एकेक ओळीवरून ‘साज’ यांच्या शायरीतील गंभीर व गहनतेची कल्पना येते. तो शोध, अतीत, आठवणी, सोबती, मरण, मन अशा विविध अंगांनी जीवनास चाचपडतो.
किसे टटोलने निकाला है तू मेरे अंदर
वह अब नहीं है इधर, क्यों तलाश करता है?
कई *मौजो ने दम तोडा था जिस पर
सुना है वह किनारा मर रहा है
‘साज’ हा फार संवेदनशील आहे. मित्र मंडळ, ज्येष्ठ परिचित-अपरिचित कवी, कलाकार यांच्या मरणाने तो व्यथित होतो. आत्या, बहीण, आजी, वडील यांच्या मरणावर त्याने शोक-काव्य लिहिणे स्वाभाविक आहे, पण कवी फैज, गालिब, मजरूह सिकंदर अली वज्द, कालिदास गुप्ता इत्यादींच्या तसेच नौशाद, मोहम्मद रफींच्या मरणावरील त्यांच्या कविता दिङ्मूढ करून उदास करणाऱ्या आहेत. मरण या विषयावरचे ‘साज’चे काही शेर ऐका-
बजा कि लुत्फ है दुनिया में शोर करने का
नशा कुछ और है * गुमनाम मौत मरने का
हासिल और लाहासिल पर अब वैसे भी क्या गौर करें?
और छलकने वाला हो जब सांसों का *पमाना भी
*दरख्त रूह के झूमे, परिन्दे गाने लगे
हमें उधर के *मनाजिर नजर आने लगे
म्हणून ‘साज’ एक सल्ला देतो-
मौत से आगे सोच के आना, फिर जी लेना
छोटी छोटी बातों में दिलचस्पी लेना
अब्दुल अहद ‘साज’चा जन्म मुंबईला १६ ऑक्टोबर १९५० ला झाला. वडिलांचे नाव अब्दुल रज्जाक सय्यद, पत्नीचे नाव फरीद. उर्दूत ‘साज’चे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत, ‘खामोशी बोल उठी है’ (डिसेंबर १९९०), ‘सरगोशियाँ जमाने की’ (ऑक्टोबर २००३).
‘साज’च्या शायरीत हिन्दी, फारसी शब्दांचे मोहक मिश्रण आढळते. हे काही शेर-
जब तक शब्द के दीप जलेंगे सब आयेंगे तब तक यार
कौन उतरेगा दिल के अंधे भावों के मतलब तक यार
चंद बरस की राह में कितने साथी जीवन छोड गये
जाने कितने घाव लगेंगे उम्र कटेगी जब तक यार
पुछ न क्या थी पिछले पहर की दर्दभरी *अंजानी चीख
जो मन के पाताल से उठी रह गई आके लब तक यार
निदा फाजलींच्या मते ‘साज’चा जीवनप्रवास प्रदीर्घ होऊनही त्याची सर्जनगती अन् काव्यदर्जा टवटवीत आहे. त्याच्या मानसिक व बौद्धिकतेचे लक्षणीय तेज, त्याच्यातली व्यक्ती व त्याच्या व समाजाच्या नाते कारणीभूत आहे. ते नाते या नात्याच्या निर्मितीत सुफी वृत्ती, ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्ये अंतर्भूत आहेत. ‘साज’चे काही शेर या वक्तव्यांची साक्ष देतील.
फिके, *बेजान, *जर्द चेहरों की तरह
सूने रस्तों, उदास शहरों की तरह
लगता है कभी कभी ये जीवन सारा
*इतवार की सूनसान दोपहर की तरह
परंपरेच्या संदर्भात ‘साज’ म्हणतो-
कैसे तोडे इसे जो टूट के मिलती हो गले
लाख चाहा कि *रिवायत शिकनी आये हमें
विद्वान व कवीतला भेद ऐका-
जवाब ढूँढने मे लुत्फ अहले-दानिश को
मुझे सवाल को नग्मा बना के गाने में
‘साज’चा एक प्रश्न
मंजिल मिट्टी की, रस्ता मिट्टी का, सफर मिट्टी का
मिट्टीवालों को फिर कैसा *खौफ व खतर मिट्टी का?
‘साज’च्या विविधरंगी शेर असे
आयी न हवा *रास जो सायों के शहर की
हम जात के *कदीम गुफाओं में खो गए
जिन को खुद जा के छोड आये कबरों में हम
उन से रस्ते में मुठभेद होती रही
हम अपने जख्म कुरेदते है, वो जख्म पराये धोते थे
जो हमसे ज्यादा जानते थे, वो हम से ज्यादा रोते थे
सोचकर भी क्या जाना, जानकर भी क्या पाया
जब भी आईना देखा, खुद को दुसरा पाया
समीक्षक गोपीचंद नारंगच्या मते ‘साज’ची शायरी आधुनिक उर्दू शायरीत भिन्न आहे भाषिकदृष्टय़ा, शैलीदृष्टय़ा ती शब्दांचा वापर पृथकपणे करते. ती क्लासिकलच्या समीप भासते. पण तिच्यात व्यक्त होणाऱ्या समस्या वर्तमान जीवनाशी निगडित आहेत. ‘साज’च म्हणतो.
ये *खुश्क कलम, *बंजर कागज,
दिखजाये कैसे समझाये क्या
हम *फस्ल निराली काटते थे,
हम बीज अनोखे बोते थे
या निराळ्या पिकाचं बियाणाचं गूढ समजण्यासाठी-
शायद कि तुम पर सदियों का *कर्ब खुलें
मिलते रहियों ‘साज’ हम ऐसे वैसों से
अली सरदार जाफरी म्हणतात, अब्दुल अहद ‘साज’च्या काव्यात कोमलता, सौंदर्यभाव आहे तर कटु वचनेदेखील आहेत. कतील शिफरई, मजहर इमाम, असद बदायूनी, देवेंद्र इस्तर सारख्या नामवंत कवी-साहित्यकारांनी ‘साज’च्या काव्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. ‘साज’ने १९६६ सालापासून काव्यसृजन सुरू केले. जवळपास पन्नास वष्रे होतील त्यांच्या सृजनप्रवासाला. तो म्हणतो-
मैं एक *साअते-बेखुद छू गया था जिसे
फिर उस को लफ्ज तक आते हुए जमाने लगे
आयुष्याची संक्षिप्तता जाणूनही ईश्वरास तो म्हणतो-
मैं बढते बढते किसी रोज तुझ को छू लेता
कि गिन के रख दिये तूने मेरी *मजाल के दिन
आता काही इश्किया रंग पाहू या-
वह तो ऐसा भी है, वैसा भी है, कैसा है मगर?
क्या गजब है कोई उस *शोख के जैसा भी नहीं
आती है सौ दिशाओं से याद एक शख्स की
गुजरे हुओं की *बज्म सजाई है बार बार
घास कब है, ये हरी पलकें है मेरी
जिस पे वो मुद्दत से चलता आ रह है
मुझ को मंजूर है ऊंचाई से गिरना भी, मगर
तेरी पलकों से जो टूटे वो सितारा हो जाऊ
अब्दुल अहद ‘साज’ बी. कॉम. असून मूलत: कॉम्प्युटर प्रोग्रॅमर आहेत. त्यांचा मुंबईत व्यवसाय असून शायरीप्रमाणे ते यशस्वी व्यावसायिकही आहेत.
दिल्ली, गुलमर्ग, बारा कमानी (विजापूर) अशा स्थळांवरही सिंकदर अली वज्द प्रमाणे (अजंठा, एलोरा काव्य) ‘साज’ने दीर्घ काव्य रचले आहे. ‘साज’च्या माहिये व दोह्य़ांचे रंग बघा-
बीती हुई सदियों के
नक्श किनारों पर
*महफूज है नदियों के
बस रूह अकेली है
सांस तो जीवन भर
धडकन की सहेली है
कल शब मैंने ध्यान में सुनी समय की चीख
इक आंसू में कैद थी सदियों की *तारीख
बीत रही है *रायगाँ और गयी जो बीत
इक बेचेहरा दरमियां इक बेशब्द अतीत
‘साज’ या दिलकश रचना लिहून म्हणतो-
अब आके कलम के पहलू में
सो जाती है *बेकैफी से
मिसरों की शोख हसीनाएं
सौ बार जो रूठी मनाती थीं
अन् याची कारणमीमांसा अशी करतो-
जो शब्द उडमने भरते थे आजाद
फजाए *मानी में
यूँ शेर की बंदिश में सिमटे, गोया िपजरे के तोते थे
आता शेवटी ‘साज’च्या दोन लहान कविता
एक रिकामी कविता
जीवन माझं
रिकाम्या िपजऱ्यासारखं झालंय
ना पक्षी, ना दाणे
ना उडण्याचं स्वातंत्र्य
येरझारा घालणारी हवा
िपजऱ्याच्या तारांमध्ये
सळसळतही नाही.

चकमा
माझं वार्धक्य
मला शोधीत होतं
मला त्याने गाठण्यापूर्वीच
मी त्याला चकमा देऊन
उरल्यासुरल्या तारुण्याचा धोका देऊन
आपल्या कबरीत जाऊन पहुडलो.
मुम्किन : संभव, सीपी : िशपला, मौज : लाटा, गुमनाम : निनावी, पमाना : चमक, दरख्त : झाडं, मनाजिर : दृश्ये, अंजानी : अपरिचित,
बेजान : निर्जीव, जर्द : पिवळे, इतवार : रविवार, रिवायत-शिकनी : परंपरा भंग,
खौफ व खतर : भय व खतरा, रास : भाषणे,
कदीम : प्राचीन, खुश्क : शुष्क ,बंजर : ओसाड, फस्ल : पीक, कर्ब : बेचनी, साअते-बेखुद : तल्लीनतेचा क्षण, मजाल : धारिष्टय़,
शोख : खटय़ाळ, चंचल, बज्म : मफील,
महफूज : सुरक्षित, तारीख : इतिहास, रायगाँ : व्यर्थ, बेकैफी : धुंदीत राहणे, नीरस्त, मानी : अर्थ,
डॉ. राम पंडित – dr.rampandit@gmail.com

मराठीतील सर्व सहेर होने तक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urdu poet from mumbai abdul ahad saad
First published on: 31-10-2015 at 00:39 IST