विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो यांचे जन्मद्विशताब्दीवर्ष  यंदा १२ जुलैपासून सुरू झाले आहे. त्या निमित्तानेविजनात राहून जनांचा विचार करणाऱ्या या तत्त्वचिंतकाच्या जीवनप्रवासाचा आढावा..

निसर्गावर अतीव प्रेम करणारे हेन्री डेव्हिड थोरो हे एकोणिसाव्या शतकातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्या काळी ज्या सामाजिक परंपरा प्रचलित होत्या त्यांच्या राजमार्गाने न जाता, आंतरिक प्रेरणेने त्यांनी आपल्या आयुष्याची स्वतंत्र पायवाट निर्माण केली. प्रस्थापित राजकीय विचारांना विरोध करणाऱ्या आणि धर्मसत्ता नाकारणाऱ्या थोरोच्या मतांना त्यांच्या हयातीत विशेष मान्यता मिळाली नाही, तरी नंतर मात्र त्यांच्या तत्त्वप्रणालीला जागतिक पातळीवर असाधारण महत्त्व प्राप्त झाले. थोरोच्या विचारांचा प्रभाव टॉलस्टॉय विल्यम बटलर यीट्स, सिंक्लेअर लेविस, जॉर्ज बर्नार्ड शॉ या प्रतिभावंतांवर पडला. म. गांधीही थोरोच्या विचारसरणीमुळे प्रभावित झाले होते. थोरोच्या ‘सिव्हिल डिसओबिडिअन्स’ या निबंधापासून प्रेरणा घेऊन गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात ‘सविनय कायदेभंगा’ची चळवळ सुरू केली होती. तसेच अमेरिकेतील वर्णभेदाला अहिंसात्मक मार्गाने विरोध करण्याची कल्पना आपल्याला थोरोच्या लेखनामुळे सुचली, असा निर्वाळा मार्टिन ल्यूथर किंग यांनी आत्मचरित्रात दिलेला आहे. कोणत्याही लेखकाचे साहित्य आणि त्याचे व्यक्तिगत जीवन यात एकवाक्यता हवी, असे मत आवर्जून व्यक्त करणाऱ्या थोरोचे लेखन आणि आयुष्यक्रम यात सहजसुंदर सुसंगती होती.

Virendra Sehwag Mocks Adam Gilchrist in Podcast said We are rich people we don't go to poor countries
“आम्ही श्रीमंत आहोत, गरीब देशांमध्ये खेळायला जात नाही!” एकाच वाक्यात सेहवागने गिलख्रिस्टची बोलती केली बंद
27 Year Old Youtuber Abhideep Saha Dies Video of No Passion No Vision In Memes
२७ वर्षीय प्रसिद्ध भारतीय युट्युबरचे निधन; एकाच वेळी अवयव झाले निकामी, कष्टाने कमावले होते ५ लाख सबस्क्राइबर्स
Emraan Hashmi Mallika Sherawat 20 year feud ended with hug
Video: ‘मर्डर’नंतर २० वर्षांनी एकत्र दिसले इमरान हाश्मी अन् मल्लिका शेरावत, दोघांचं भांडण का झालं होतं? जाणून घ्या
Aarti Chabria welcomes baby boy month ago
पाच वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटंटशी केलं अरेंज मॅरेज, गर्भपातानंतर आता ४१ व्या वर्षी आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव सांगत म्हणाली…

अमेरिकेच्या मेसॅच्युसेट्स राज्यातील काँकॉर्ड या गावी एका सामान्य कुटुंबात थोरोचा जन्म झाला. १२ जुलै १८१७ ही त्याची जन्मतारीख. (थोरोच्या स्मरणार्थ आता १२ जुलै हा दिवस ‘र्रेस्र्’्र्रू३८ ऊं८’- ‘साधेपणाचा दिवस’ म्हणून जागतिक पातळीवर पाळला जातो.) थोरोच्या वडिलांचा शिसपेन्सिली तयार करण्याचा कारखाना होता आणि तो तसा जेमतेमच चालत होता. बालपणापासून थोरो एकांतप्रिय आणि आत्ममग्न वृत्तीचे होते. बुद्धीने एक अतिसामान्य मुलगा अशी त्यांची शाळकरी जीवनातील ओळख होती. प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते हॉर्वर्ड विद्यापीठात दाखल झाले. प्रख्यात कवी हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो हे थोरोचे प्राध्यापक होते, नंतरच्या काळात तत्त्वचिंतक म्हणून मान्यता पावलेले कार्लाइल आणि इमर्सन हे सहाध्यायी होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना थोरो याने ग्रीक, जर्मन आणि फ्रेंच भाषेचा सखोल अभ्यास केला. अभ्यासक्रमातील पाठय़पुस्तके वाचण्याऐवजी ते आपल्या आवडीची पुस्तके वाचत असत. त्यामुळे थोरोचा वाचनपरिसर विस्तारला, तरी परीक्षेत ते फारसे काही चमकले नाहीत.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर थोरो काँकॉर्डला परतला. याच सुमारास त्याचे सहाध्यायी राल्फ वॉल्डन इमर्सन हेही तेथे राहण्यासाठी आले होते आणि तत्त्वज्ञ म्हणून त्यांना अमेरिकेत मान्यता मिळण्यास सुरुवात झाली होती. थोरो इमर्सनकडे आकर्षित झाला आणि त्या दोघांत घट्ट मैत्री झाली. इमर्सन थोरोचे गुरू होते. तसेच पालकही. त्यांनी आयुष्यभर थोरोची काळजी घेतली. थोरोला नेहमीच आर्थिक मदत केली, तसेच त्यांच्या लेखनाला प्रसिद्धीचा प्रकाश दिसावा म्हणूनही प्रयत्न केले. इमर्सनचे ‘नेचर’ हे पुस्तक वाचल्यावर थोरो निसर्गाकडे वळला. इमर्सनमुळेच थोरोचा परिचय हिंदू तत्त्वज्ञानाशी झाला. नंतर भगवद्गीतेमुळे प्रभावित झालेल्या थोरोने ख्रिश्चन धर्मपरंपरा नाकारली आणि चर्चसारख्या धार्मिक संस्थेचा त्याग केला.

थोरो याला दैनंदिन व्यवहारात माणसांपेक्षा निसर्गाचा सहवास प्रिय वाटू लागला. निसर्गातील लहानसहान गोष्टी त्याचे लक्ष वेधून घेत असत. किडा-मुंगी, सरपटणारे प्राणी, पक्षी, फुले, झाडे यांच्याकडे ते तासन्तास स्तब्ध बसून एकाग्रपणे पाहात असत. सूक्ष्म नजरेने आणि स्वतंत्र प्रज्ञेने त्याने जे निसर्गाचे निरीक्षण केले, ते नंतर आपल्या दैनंदिनीत नोंदवून ठेवले. त्याच्या दैनंदिनीतील मजकूर सुमारे सात हजार पृष्ठांचा आहे. अर्थात हे सर्व करीत असताना, थोरोला उपजीविकेसाठी कठोर परिश्रम करावे लागत होते. त्याने शिक्षकाची नोकरी केली, शाळा चालवली, वडिलांच्या शिसपेन्सिलींच्या कारखान्यात काम केले, व्याख्याने दिली आणि लेखनही केले; पण या सर्व उद्योगांतून त्यांना अपेक्षित आर्थिक प्राप्ती झाली नाही. शेवटी इमर्सनने त्याला मदत केली. त्याने न्यूयॉर्कमधील आपल्या भावाच्या मुलांना शिकविण्याचे काम त्याला दिले. पण थोरो तेथे जेमतेम वर्षभरही राहू शकला नाही. न्यूयॉर्कचे झगमगाटी वातावरण, माणसांची गर्दी आणि धावपळीचा जीवनक्रम त्याला मुळीच मानवला नाही. ते काँकॉर्डला परत आला. निसर्गविज्ञानाचा अभ्यास करणे हेच आपल्या आयुष्याचे श्रेयस आणि प्रेयस आहे, हे त्याला एव्हाना समजून चुकले होते.

थोरो याला निसर्गातील विजनवासाची ओढ लागली. सभोवतालची माणसे त्याला अनावश्यक काबाडकष्ट करणारी, वृथा चर्चेत वेळ घालवणारी, आवश्यकतेपेक्षा अधिक कठोर नीतीच्या वल्गना करणारी आणि उथळ वाटू लागली. पोट भरण्यासाठी अप्रिय व्यवसायात पडणे आणि अनैतिक तडजोडी करून श्रीमंत होणे म्हणजे स्वत:शी प्रतारणा करणे, असे थोरोचे मत होते. त्याने आपल्या गरजा कमी केल्या. जीवनाच्या प्राथमिक गरजांच्या पूर्तीसाठी लागणारा वेळ वगळता इतर सर्व खेळ त्याने निसर्गाचा अभ्यास करण्याचे ठरवले. याच सुमारास जंगलातील वॉल्डन तळ्याच्या वायव्येस असलेला आपल्या मालकीच्या जमिनीचा एक तुकडा इमर्सनने थोरोला देऊन टाकला. त्यामुळे जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची थोरोच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात साकार झाली.

१८४५ च्या मार्च महिन्यात थोरो वॉल्डन तळ्याच्या काठी राहण्यास आला. आपली झोपडी बांधून पूर्ण करण्यासाठी त्याला पंधरा दिवस लागले आणि ४ डॉलर २५ सेंट्स इतका खर्च आला. झोपडीलगतचा दोन एकरचा जमिनीचा तुकडा त्याने लागवडीसाठी वापरण्याचे ठरवले. उन्हाळ्यात त्याने त्या जमिनीत भाजीपाला लावला. गरजेपुरते धान्य पिकवणे आणि ते शिजवून खाणे यामुळे माणसाच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, असे त्याच्या लक्षात आले. साधेपणा आणि काटकसर म्हणून त्याने चहा-कॉफी सोडून दिली आणि तो पूर्णपणे शाकाहारी बनला. १५’x१२’च्या झोपडीत फक्त जीवनावश्यक वस्तूच होत्या. थोरो दिवसभराच्या निसर्गनिरीक्षणातून काढलेले निष्कर्ष आणि निसर्गाच्या अवलोकनाचा आपल्या मनावर पडलेला प्रभाव याविषयी आपल्या दैनंदिनीत विस्ताराने नोंदी करीत असे. थोरोची एक नोंद अशी आहे – ‘वसंत ऋतूत पानगळ सुरू झाली की, मला दुपारपासून संध्याकाळपर्यंत घरातच बसावे लागे. सततचा पाऊस आणि ढगांच्या गडगडाटामुळे मन प्रसन्न होत असे. दिवस लवकर संपत असे. त्यामुळे संपूर्ण संध्याकाळ विचार करण्यासाठी मिळत असे.’ वॉल्डन तळ्याकाठच्या जंगलातील वास्तव्यात थोरोने आत्मचिंतन केले. काटकसर, स्वावलंबन आणि साधेपणा यांचे महत्त्व त्याला पटले; स्वातंत्र्याचे मूल्य उमगले व निसर्गातील काही घडामोडी त्यांच्या आकलनकक्षेत आल्या. ६ डिसेंबर १८४५ रोजी थोरोने वॉल्डनचा निरोप घेतला. उर्वरित आयुष्यात तो पुन्हा वॉल्डन तळ्याकाठी राहायला आला नाही. वॉल्डन तळ्याकाठी राहणे ही थोरोच्या आयुष्यातील एक अटळ आणि अपरिहार्य अवस्था होती. तो अनुभव तो समरसून जगला आणि पुन्हा नव्या अनुभवाकडे वळला. ‘जीवन म्हणजे एका अनुभवाकडून दुसऱ्या अनुभवाकडे जाणे,’ अशी थोरोची धारणा होती आणि सामाजिक प्रतिष्ठा व त्या अनुषंगाने होणारी आर्थिक प्राप्ती म्हणजे जीवन नव्हे, असा त्याचा दृष्टिकोन होता.

वॉल्डन सोडल्यावर थोरो इमर्सनच्या घरी वास्तव्याला गेला. युरोपच्या दौऱ्यावर गेलेल्या इमर्सनला आपले घर सांभाळणे, बागबगीचा बघणे या कामासाठी थोरोची मदत हवी होती. इमर्सनच्या ग्रंथालयात बसून थोरोने वॉल्डनविषयी लेखन केले तसेच ‘सिव्हिल डिसओबिडिअन्स’ हा निबंध लिहून पूर्ण केला. त्याच सुमारास कार्ल मार्क्‍स हा विचारवंत आपला ‘साम्यवादी जाहीरनामा’ तयार करीत होता. थोरोचे लक्ष तत्त्वांवर होते; समाजसुधारणेवर नव्हते. ज्या समस्यांचे उत्तर राजकीय विचारप्रणाली आणि तत्त्वज्ञान यांच्याशी मिळत नाही, त्या समस्यांचे दीर्घकाळ चिंतन करून थोरोने ‘सिव्हिल डिसओबिडिअन्स’ हा दीर्घ निबंध सिद्ध केला. तसे पाहिले, तर या निबंधात प्रक्षोभक असे काहीच नाही. रस्ते बांधणे किंवा शिक्षण देणे अशा समाजोपयोगी कार्यासाठी कर द्यायला थोरोची हरकत नव्हती; पण दडपशाही आणि साम्राज्यविस्तार यासाठी द्याव्या लागणाऱ्या कराला त्याचा सक्त विरोध होता. ‘सरकारी जुलुमाला विरोध करण्यासाठी शांततामय आणि सविनय कायदेभंगाखेरीज अन्य उपाय नसतो,’ असा निष्कर्ष थोरोने या निबंधात काढला आहे. याच दिवसांत सरकारी कर न भरल्याने, थोरोला कारावासाची शिक्षा झाली होती.

थोरो आपल्या निसर्गनिरीक्षणात मग्न होती. त्या काळात अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध झालेली चळवळ कळसाला पोहोचली होती व सरकार गुलामगिरीचे समर्थन करीत होते. अ‍ॅन्थनी बर्न्‍स नावाच्या एका फरारी निग्रो गुलामाला पकडून मॅसॅच्युसेट्स सरकारने पुन्हा गुलामगिरी करण्यास पाठवले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. एका गरीब माणसाला गुलामगिरीत खितपत पडण्यासाठी सरकार बळजबरी करते, हे पाहून थोरोचे अंत:करण हेलावले. गुलामगिरीविषयी आणि या अमानुष घटनेवर टीका करताना थोरो याने म्हटले होते : ‘जीवन आहे त्याहून अधिक समृद्ध, मूल्यवान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे; जीवन बिघडवणे नव्हे.’ एकूणच काय, तर निसर्गवेत्ता थोरो हा समाजवेत्ताही होता.

वर्षांनुवर्षे थोरोने काँकॉर्डच्या परिसराविषयी आणि मेरिमॅक या नदीच्या सान्निध्यात जे चिंतन केले, ते त्याच्या ‘ए वीक ऑन दि काँकॉर्ड अ‍ॅण्ड मेरिमॅक रिव्हर’मध्ये ग्रथित झाले आहे. आरंभी हे पुस्तक प्रकाशित करण्यास कोणीही तयार नव्हते. शेवटी तीन वर्षांनंतर इमर्सनच्या सल्ल्यावरून एका प्रकाशकाने ते १८४९ मध्ये प्रसिद्ध केले, पण प्रसिद्धीचा सर्व खर्च थोरोलाच करावा लागला होता. पुस्तक प्रसिद्ध झाले, पण वाचकांना ते फारसे आवडले नाही. त्यामुळे या पुस्तकापासून थोरोला अपेक्षित आर्थिक प्राप्ती झाली नाही, तर प्रसिद्धीसाठी कर्जरूपाने उभा केलेला पैसा फेडताना त्याची चांगलीच दमछाक झाली. १८५४ मध्ये प्रसिद्ध झालेले थोरोचे दुसरे पुस्तक ‘वॉल्डन’ मात्र सर्वार्थाने गाजले. त्यांनी वॉल्डन तळ्याकाठी एका झोपडीत २ वर्षे, २ महिने आणि २ दिवस केलेल्या वास्तव्यासंबंधी हे लेखन आहे, त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या अपयशाची भरपाई ‘वॉल्डन’ने केली. ‘ट्रिकनर अ‍ॅण्ड फिल्ड्स’ या अमेरिकेतील तेव्हाच्या प्रख्यात प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले होते. थोरोने जो जीवनक्रम अंगीकारला होता, त्याचे हे निर्विवाद समर्थन होते. अमेरिकेत एकोणिसाव्या शतकातील जीवन औद्योगिकीकरणामुळे गुंतागुंतीचे, अवघड आणि उथळ होत चालले होते. या आपत्तीतून मार्ग काढायचा, तर कठोर साधेपणा अंगीकारला पाहिजे, असे थोरोचे मत होते. ‘वॉल्डन’मधील निवेदनाला थोरोच्या वास्तव अनुभूतीचा आधार आहे. आपले विचार ग्रंथबद्ध करण्यापूर्वी त्याचे प्रयोग त्यांनी आपल्या आयुष्यात केले होते. ज्या साध्या जीवनप्रणालीचा अनुभव त्यांनी घेतला होता, ती जीवनप्रणाली त्यांनी या ग्रंथात मांडली आहे. हिंदू धर्मप्रणालीत कर्म आणि अकर्म याविषयी जे मौलिक विवेचन आढळते, त्याचा आधार घेऊन थोरोने आपला मार्ग आखला होता. थोरोचा ‘वॉल्डन’ हा ग्रंथ सर्वार्थाने गाजला. सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच जाणकार अभ्यासकांचाही त्याला प्रतिसाद लाभला. ‘वॉल्डन’ला लाभलेल्या यशामुळे थोरोची आर्थिक स्थिती कधी नव्हे ती सुधारली आणि लेखन क्षेत्रातील त्याचे आरंभीचे अपयश पुसले गेले.

‘वॉल्डन’च्या यशामुळे थोरो पुन्हा एकदा निसर्गात रममाण झाला. निसर्गविज्ञानाविषयी त्याने प्रचंड साहित्य गोळा केले होते आणि त्याची नोंद दैनंदिनीत करून ठेवली होती. त्याच्या आधी त्याला ग्रंथलेखन करायचे होते, पण त्याची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. मुळातच नाजूक असलेल्या त्याची प्रकृती आयुष्यभराच्या कष्टांनी क्षीण झाली होती. अशातच त्याला क्षयाची बाधा झाली. तशी थोरोच्या कुटुंबात क्षयाची परंपरा होतीच. थोरोचा धाकटा भाऊ जॉन आणि थोरली बहीण हेलन ही अकालीच क्षयाने मरण पावली होती. मृत्यूच्या परिसरात वावरतानाही थोरो शांत आणि सर्वार्थाने तृप्त होता. भेटायला आलेल्या एका अभ्यागताला त्याने म्हटले होते : ‘‘मृत्यू हा मनुष्यमात्राची नियतीच आहे. मी अगदी लहान होतो तेव्हा मला एक दिवस मरायचे आहे, हे कळून चुकले होते; म्हणून मला मृत्यूचा विषाद वाटत नाही.’’ ६ मे १८६२ रोजी वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी थोरोचे निधन झाले. कर न भरल्यामुळे थोरोला एके काळी अटक करणारा सॅम स्टेपल्स हा तुरुंगाधिकारी नंतर त्याचा मित्र झाला होता. तो थोरोच्या अंत काळी त्याच्याजवळ होता. त्याने इमर्सनला सांगितले की, ‘‘कोणत्याही माणसाला इतक्या आनंदाने आणि शांतपणे मरताना मी पाहिले नाही.’’ अर्थ सरळ आहे – हेन्री डेव्हिड थोरोचे जीवन आणि लेखन यात पूर्णपणे एकरूपता होती. ही एकरूपता जशी आश्वासक होती, तशीच अपवादात्मकही!