राजेश बोबडे

देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकरी, सामान्य माणूस देशातील घडामोडींचा केंद्रबिंदू होण्याऐवजी राजकारणी व राजकारणच केंद्रबिंदू झाले. राजकारण्यांचा सर्व भर निवडणुका व मतदार यांच्यावर आहे. दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांतील रकानेच्या रकाने केवळ राजकीय घडामोडींनीच व्याप्त आहेत. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिंतन व्यक्त करताना म्हणतात, ‘‘मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला.. अशी परिस्थिती भारतवर्षांत आजच आलेली आहे असे नाही किंवा मागे एकदाच ती येऊन गेली असेही नाही. अनेकदा या गोष्टीचे उत्थान व अनेकदा ती व्यवस्थाही झाली आहे. मग आज त्या पूर्वेतिहासाचा काही उपयोग करता येणार नाही काय?’’ महाराज याचे होकारार्थी उत्तर देऊन म्हणतात, ‘‘ही गोष्ट विसरून चालणार नाही की, देश, काल, परिस्थितीचा विचार करून ज्या काळात जे योग्य तेच त्या काळी करणे उपयोगी ठरते, अर्थात या दृष्टीने साधनेच नव्हेत तर पुढारी व संप्रदायसुद्धा कालानुसार बदलावे लागतात किंबहुना देवाच्याही बहिरंगात बदल करावा लागतो, कारण ही सर्व सृष्टीच्या विकासाची साधने आहेत. त्यांच्या विकासाला पोषक स्वरूप देणे हीच गोष्ट महत्त्वाची आहे. या सर्वाचे ‘साध्य’ हेच की प्रत्येक काळी सृष्टी निरूढतेने सत्याचरण करणारी असावी; जनता समाजातील सुखदु:खे जाणणारी राहावी; सेवा करणाऱ्याला अधिकार व परंपरा दाखवून प्रलोभनात पडणाऱ्याला दंड देण्यात यावा. आतापर्यंत हाच धडा सृष्टीने समोर मांडला आहे; पण तो डावलून देश-कालाचा विचार न करता मागच्याच साधनांचा जप करीत गेल्यामुळे ज्या ज्या वेळी असा संक्रमण काळ आला त्या त्या वेळी असाच गलबला होत गेला आहे; जो आज आपण पाहत आहोत.’’ मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला असे होण्याच्या अनेक कारणांपैकी काही कारणे देताना महाराज म्हणतात. मोठय़ांच्या सहवासात राहणाऱ्यांमध्ये मोठेपणाच्या धोरणाऐवजी मोठेपण दाखविण्याचे व्यसनच बहुधा वाढत असते व ते मुख्य कार्यकर्ता गेला तरी सुटत नसते. अशा मोठय़ांच्या गटवाल्यांची एक विशिष्ट जातच बनत जाते. कालाच्या अनुकूलतेने त्यांना प्रोत्साहन मिळते तोवर त्यांचे बरे चालते. पण जेव्हा समाजकारणात बिघाड होऊ लागतो तेव्हा समाजहितैषी लोकांना त्यांच्याविरुद्ध गेल्याशिवाय गतीच उरत नाही व ते त्या बडय़ांच्या छत्रचामरांना सहन होणे शक्य नसल्याने अखेर होईल त्या प्रकारे क्रांती घडवून आणावीच लागते. अर्थात ते घडत असताही, आपला मूर्खपणा हा शहाणपणाच्या नावावरच कसा खपवता व टिकवता येईल या विचाराने जेव्हा आपल्या मताचे मदतगार निर्माण केले जातात तेव्हा अशी विचित्र परिस्थिती होणे साहजिकच असते. पण मग तो गलबला शांत करावा म्हणून जर कोणी त्याला त्याच स्वरूपात दाबून टाकण्याचा प्रयत्न करेल, तर तो क्रिया-प्रतिक्रियात्मक अग्नी धुमसत राहतो व एकदा ज्वाला वर उफाळल्या की त्याला जनतेची साथ मिळून सत्य तेच त्या संघर्षांतून निष्पन्न होत असते. सध्याचा काळही हा असाच आहे.

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”