एल. के. कुलकर्णी,भूगोल कोशाचे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक lkkulkarni.nanded @gmail.com

इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचा फेलो आणि फ्रेंच अ‍ॅकॅडमीचा सदस्य, तसंच जगातला एक थोर संशोधक आपल्या गावात, हिंगणघाट येथे काही दिवस राहून मरण पावला, हे तेव्हाही गावात कुणाला माहीत नव्हते आणि त्यानंतरही..

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

जे लोक महान कार्य करतात ते स्वत: आणि त्यांचे कार्य अजरामर होऊन जाते. पण कधी कधी असे महान कार्य शिल्लक राहते आणि ते करणारे मात्र इतिहासाच्या काळोखात हरवून जातात. लेफ्टनंट कर्नल विलियम लॅम्ब्टन हे अशा विस्मृत महान संशोधकांपैकी एक होते. ‘ग्रेट इंडियन आर्क’ नावाच्या जगातील सर्वात महान व प्रदीर्घ काळ चाललेल्या संशोधन प्रकल्पाचे ते जनक. फारच कमी लोकांना माहीत आहे की, महाराष्ट्रात हिंगणघाट गावातील एका कोपऱ्यात ते चिरविश्रांती घेत आहेत. 

लॅम्ब्टन यांचा जन्म १७५३ मध्ये इंग्लंड मधील यॉर्कशायर परगण्यात झाला. बालपणापासून त्यांना गणितात विशेष गती होती. दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहण्याच्या प्रयत्नात त्यांचा एक डोळा कामातून गेला होता. ईस्ट इंडिया कंपनीत ते सैनिक म्हणून रुजू झाले. १७९९ मध्ये श्रीरंगपटणमच्या लढाईत टिपू सुलतानचा पाडाव करून इंग्रजांनी मैसूर राज्य जिंकले. त्यानंतर लॉर्ड वेलस्ली यांनी जिंकलेल्या भूप्रदेशाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फ्रान्सिस बुकमन यांनी मैसूर राज्याचे कृषी सर्वेक्षण आणि मॅकेन्झि यांनी भूरचनेच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. इंग्रजांचा उद्देश जिंकलेल्या भागाचे चांगले नकाशे तयार करणे हा होता. पण अचूक नकाशे तयार करण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाची वक्रता विचारात घ्यावी लागते. लॅम्ब्टन यांनी १७९९ मध्ये एक योजना मांडली. त्यानुसार ते भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील मद्रास ते पश्चिम किनाऱ्यावरील मंगलोर यामध्ये त्रिकोणमितीय ( ळ१्रॠल्लेी३१्रू २४१५ं८) सर्वेक्षण करणार होते. त्यामुळे दक्षिण भारतीय द्वीपकल्पाच्या त्या दोन बिंदूंच्या मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाची (बाक) वक्रता कशी आहे हे कळणार होती. बऱ्याच विचारांती लॅम्ब्टनची योजना मान्य झाली.

१० एप्रिल १८०२ मध्ये लॅम्ब्टननी मद्रास (आताचे चेन्नई ) येथील सेंट थॉमस माऊंट येथे पहिली मूळरेषा (बेस लाइन) रेखण्यास सुरुवात केली. त्या वेळी महाराष्ट्रात अमृतराव हे पेशवेपदावर येत होते आणि काही महिन्यांतच दुसरे बाजीराव व इंग्रज यांच्यात वसईचा तह होणार होता. एकंदर भारतातील राजे, संस्थानिक व ईस्ट इंडिया कंपनी हे जहागिरी, राजवटी व संपत्ती यात व्यस्त होते. आणि त्याच वेळी लॅम्ब्टन मात्र पृथ्वीची वक्रता आणि भारतभूमीची रचना व आकार शोधण्याच्या आपल्या महान स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत होते.

मद्रास येथून सर्वेक्षण करीत ते द्वीपकल्पाच्या दुसऱ्या टोकाशी मंगलोरला पोहोचले. दरम्यान भारताच्या दक्षिणोत्तर सर्वेक्षणाची त्यांची योजना मान्य झाली होती. त्यातून कन्याकुमारी ते हिमालय या सुमारे तीन हजार किलोमीटर अंतरातील भूगोलाच्या कंसाची वक्रता निश्चित होणार होती. हे कार्य एवढे प्रचंड व कठीण होते की त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. शिवाय या शास्त्रीय प्रकल्पातून प्रत्यक्ष व दृश्य असा कोणताही आर्थिक लाभ नव्हता. पण अखेर याही प्रकल्पाला मान्यता मिळाली. १८०६ मध्ये बंगळूरुच्या उत्तरेपासून सर्वेक्षण करीत ते दक्षिणेला केप कामोरीन (कन्याकुमारीचे भूशीर) पर्यंत पोहोचले. इथून पुढे कन्याकुमारी ते हिमालय या सर्वेक्षणाचे कार्य त्यांनी सुरू केले. या कामात कल्पनातीत अडचणी आल्या.

सर्वेक्षणासाठीचे थिओडोलाइट  ( ३ँी’्रि३ी) हे उपकरण पुरुषभर उंचीचे व अर्धा टन वजनाचे होते. ते वाहून नेण्यासाठी बारा माणसे लागत. सोबत अंतरे मोजावयाच्या धातूंच्या जड साखळय़ा होत्या. त्या भुसा भरलेल्या पेटीत ठेवलेल्या असत. सामान वाहून नेण्यासाठी घोडे, उंट, खेचरे किंवा हत्ती असत. त्यामुळे या ताफ्यामध्ये संशोधक, अधिकारी यांच्यासोबत सिग्नलमेन, रनर, पोर्टर माहूत हेही होते. शिवाय जंगलातील वन्य प्राणी, दरोडेखोर, स्थानिक बंडखोर इ.पासून रक्षणासाठी सैनिकांची तुकडी असे. त्यात पुन्हा पाऊस, ऊन, बर्फवृष्टी, धुळीची वादळे हेही होते. सव्‍‌र्हे करतांना दुर्बिणीतून बघायचे टार्गेट १०० किंवा अधिक कि.मी.वर असे. म्हणून हे काम पावसाळय़ात किंवा पावसाळा संपताच करावे लागे. कारण पावसामुळे धूळ खाली बसून हवेची दृश्यता चांगली होई. पण पावसाळय़ात तुफान पाऊस, घनदाट जंगले, रोरावत्या नद्या, प्रचंड पूर, साप, अजगर, वाघ इ. वन्य प्राणी, डास, साथीचे आजार व अकल्पित प्रसंग यांच्याशी सामना करावा लागे. ताफ्यातील लोक पळून जात, आजारी पडत, बंड करीत. एकदा कृष्णा – गोदावरी खोऱ्यात भयानक पावसाळा, जंगल व आजारपण यामुळे अख्खी टोळी जायबंदी झाली. अखेर विशेष पथक पाठवून उपाशी, आजारी मरणोन्मुख अशा १५० लोकांना हैद्राबादला नेण्यात आले. त्यातही १५ जण मरण पावले. ‘जे जिवंत आले, ते माणसासारखे दिसत नसून जणू कबरीतून उठून चालू लागलेल्या प्रेतांचा तो थवा होता’ असे त्या प्रसंगाचे वर्णन जॉर्ज एव्हरेस्ट यांनी केले आहे. असे प्रसंग नेहमीच येत. 

पण सर्व अडचणी व संकटे यावर मात करीत लॅम्ब्टननी आपले कार्य सुरू ठेवले. रात्री जागून ते ताऱ्यांचे वेध घेऊन त्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश निश्चित करीत. अंतर मोजावयाच्या साखळय़ांचे उष्णतेने प्रसरण व हवेतून होणारे प्रकाशाचे वक्रीभवन हेही त्यांनी मोजमाप करताना विचारात घेतले होते. म्हणूनच आज २०० वर्षांनंतर जीपीएसच्या आकडेवारीवरूनही लॅम्ब्टन यांचे काम अचूक असल्याचे सिद्ध झाले.

असे सर्वेक्षण करीत १८२३ मध्ये लॅम्ब्टन भारताच्या मध्याजवळ हिंगणघाट येथे पोहोचले. तेव्हा सर्वेक्षण सुरू करून २१ वर्षे झाली होती आणि त्यांचे वय ७० वर्षे झाले होते. कन्याकुमारीपासून १६८० किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण केलेले होते. तोपर्यंत बढती होऊन ते लेफ्टनंट कर्नल झाले होते व १८१८ मध्ये या प्रकल्पाचे अधिकृत नामकरण ‘ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ असे करण्यात आले होते. हिंगणघाट येथे असतानाच जानेवारी १८२३ मध्ये लॅम्ब्टन आजारी पडले आणि थोडय़ाशा आजारपणानंतर त्यांचा मृत्यू झाला. नागपूरचे रेसिडेंट रिचर्ड जेंकिन्स यांनी त्यांचे एक साधेसे स्मारक उभारले. त्यांचे सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट, अँडर्य़ू व्हॉग, जेम्स वॉकर यांनी पुढे १८७१ पर्यंत काम करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.

या प्रकल्पाचे फलित म्हणूनच भारताचे अचूक नकाशे तयार होऊ शकले, संपूर्ण हिमालयाचे अचूक मोजमाप करण्यात आले व सर्वात उंच एव्हरेस्ट शिखराचा शोध लागून ते शिखर जगप्रसिद्ध झाले. पण स्वत: लॅम्ब्टन मात्र भारतात दुर्लक्षित राहिले. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचा फेलो व फ्रेंच अ‍ॅकॅडमीचा सदस्य, जगातला एक थोर संशोधक आपल्या गावात काही दिवस राहून मरण पावला, हे तेव्हाही गावात कुणाला माहीत नव्हते आणि नंतरही. ‘ग्रेट आर्क’ प्रकल्पाचे इतिहासकार जॉन के. यांनी शोध घेऊन हिंगणघाटच्या बस स्टँडजवळील त्यांचे पडझडीस आलले स्मारक शोधून काढले. मग त्या दुर्लक्षित स्मारकाकडे काही लोकांचे लक्ष गेले. पुढे त्यांचे वंशजही हिंगणघाट येथे येऊन गेले.

त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल अत्यंत तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे. त्यांचा विलीयम याच नावाचा एक मुलगादेखील पुढे या सव्‍‌र्हेत पुढे सहभागी होता. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या या संशोधकाने भारताच्या सर्वेक्षणासाठी निरपेक्षपणे आयुष्य वाहून घेतले. जन्माने ब्रिटिश असले तरी स्वार्थ व अभिनिवेशरहित साधना हेच ज्याचे तप होते, असे लॅम्ब्टन हे एक ‘भूगोलऋषी’च होते.