नरेंद्र मोदी,पंतप्रधान

साधी राहणी आणि नम्र स्वभाव यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले कर्पुरी ठाकूर आयुष्यभर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. या संकल्पनेबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आम्ही प्रभावी शासकतेचे प्रारुप म्हणून अमलात आणला आहे. आजच्या सरकारच्या या कामगिरीचा त्यांना अभिमानच वाटला असता. येथील समाजातील असमानता दूर करण्यासाठी त्यांनी केलेले काम भारतमातेच्या या सुपुत्राला भारतरत्न ठरवण्याच्या तोडीचे आहे.

Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

आज जननायक कर्पुरी ठाकूरजी यांची जन्मशताब्दी आहे. सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोटय़वधी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला.  कर्पुरीजींना भेटण्याची संधी मला कधी मिळाली नाही, पण त्यांचे निकटवर्ती  कैलाशपती मिश्रा यांच्याकडून मी त्यांच्याबद्दल खूप ऐकले आहे. ते केशकर्तन हा पारंपरिक व्यवसाय असलेल्या, मागासलेल्या समाजातील होते. असंख्य अडथळय़ांवर मात करत त्यांनी मोठे यश प्राप्त  केले आणि सामाजिक उन्नतीसाठी काम केले.

हेही वाचा >>>सत्यवचनी, एकवचनीपणाची अग्निपरीक्षा आपले नेते देतील का?

जननायक कर्पुरी  ठाकूरजी यांचे जीवन साधेपणा आणि सामाजिक न्याय या  दुहेरी स्तंभांभोवती गुंफलेले आहे. अखेरच्या श्वासापर्यंतची  त्यांची साधी राहणी आणि नम्र स्वभाव सर्वसामान्यांच्या स्मृतीत कायम राहिला. त्याच्या साधेपणाचे गुणगान करणारे असंख्य किस्से आहेत. ज्यांनी त्यांच्यासोबत काम केले होते, असे काही जण ठाकूर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासह कोणत्याही वैयक्तिक बाबींसाठी स्वत:चेच पैसे खर्च करणे नेहमी कसे पसंत केले, याबाबतच्या आठवणी ते सांगतात. बिहारचे मुख्यमंत्री असताना राजकीय नेत्यांसाठी वसाहत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, पण त्यांनी स्वत:साठी याकरिता कोणतीही जमीन किंवा पैसा घेतला नाही. १९८८ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा अनेक नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावाला  गेले होते. तेव्हा त्यांच्या घराची अवस्था पाहून सर्वाना अश्रू अनावर झाले, एवढय़ा मोठय़ा माणसाचे घर इतके साधे कसे असू शकते!

त्यांच्या साधेपणाचे आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर काही वर्षांपूर्वी १९७७ मध्ये ज्यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला होता, तेव्हाचे द्यावे लागेल. त्या वेळी दिल्ली आणि बिहारमध्येही जनता दलाचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी जनता दलाचे नेते लोकनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बिहारमध्ये जमले होते. प्रमुख नेत्यांच्या मांदियाळीत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूरजी फाटका सदरा घालून फिरत होते. आपल्या अनोख्या शैलीत चंद्रशेखरजी यांनी लोकांना काही पैसे दान करण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्या निधीमधून कर्पुरीजी एक नवीन सदरा विकत घेऊ शकतील. मात्र कर्पुरीजी म्हणजे कर्पुरीजी होते.. त्यांनी पैसे तर स्वीकारले; मात्र ते मुख्यमंत्री सहायता निधीला दान केले. 

जननायक कर्पुरी ठाकूरजी यांना सामाजिक न्यायाप्रति विशेष आस्था होती. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत एका अशा समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी कार्य केले, जिथे प्रत्येकाला-  मग तो समाजाच्या कोणत्याही स्तरातील असो-  संसाधनांचे समान वाटप केले जावे, प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध असतील हे पाहिले जावे. त्यांना भारतीय समाजातल्या व्यवस्थेतील असमानता दूर करायची होती.

हेही वाचा >>>उद्धवरावांचा रडीचा डाव

काँग्रेसविरोधामागील कारणे

 आपल्या आदर्श आणि मूल्यांप्रति त्यांची निष्ठा इतकी दृढ होती की, ज्या काळात काँग्रेस पक्ष सर्वव्यापी होता, अशा युगात राहून देखील त्यांनी स्पष्टपणे काँग्रेसविरोधी भूमिका घेतली. कारण काँग्रेस आपल्या मूलभूत तत्त्वांपासून विभक्त झाली आहे याची त्यांना फार लवकर जाणीव झाली होती. त्यांची राजकीय कारकीर्द १९५० च्या दशकाच्या सुरुवातीस  सुरू झाली आणि तेव्हापासून ते कामगार वर्ग, मजूर, लहान शेतकरी आणि तरुणांच्या संघर्षांना मोठय़ा हिमतीने आवाज देत राहिले, त्यांचे प्रश्न मांडत राहिले आणि विधिमंडळाच्या सभागृहातले एक सामथ्र्यवान प्रतिनिधी झाले.

शिक्षण हा विषय त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळचा होता. त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात त्यांनी गरिबांसाठी शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अथक कार्य केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये शिक्षण द्यावे या विचारांचे ते  पुरस्कर्ते होते, त्यामुळे लहान शहरे आणि खेडय़ातील लोक शिक्षण घेऊन जीवनात यशोशिखरावर पोहोचतील, असा त्यांचा विश्वास होता. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीही अनेक उपाययोजना केल्या.

लोकशाही, वादविवाद आणि चर्चा हे कर्पुरीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक होते. लहानपणी त्यांनी भारत छोडो आंदोलनात स्वत:ला झोकून दिले तेव्हा त्यांच्यातील हे धैर्य  दिसले आणि जेव्हा त्यांनी आणीबाणीचा सर्वशक्तीनिशी प्रतिकार केला तेव्हाही ते धैर्य पुन्हा दिसून आले. जेपी, डॉ. लोहिया आणि चरणसिंहजी यांच्यासारख्यांनी त्यांच्या अद्वितीय अशा यथार्थ कामगिरीची  प्रशंसा केली.

मागासवर्गीयांना त्यांचे  हक्काचे प्रतिनिधित्व आणि संधी मिळतील  या आशेसह मागासवर्गीयांच्या अस्तित्वासाठीची  कृती यंत्रणा बळकट करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका हे जननायक कर्पुरी ठाकूरजी यांच्या भारतासाठीच्या सर्वात महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक आहे. त्यांच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला; पण ते कोणत्याही दबावापुढे झुकले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली अशी  धोरणे अमलात आणली गेली की, जिथे एखाद्याचा जन्म एखाद्याचे भाग्य ठरवत नाही या आधारावर वाटचाल करणाऱ्या अधिक समावेशक समाजासाठी पाया त्या धोरणांतून घातला गेला. ते समाजातील सर्वात मागासलेल्या स्तरातील होते पण त्यांनी सर्व लोकांसाठी काम केले. त्यांच्यामध्ये कटुतेचा कोणताही मागमूस नव्हता, हे वैशिष्टय़ त्यांना  खरोखर महान बनवते.

हेही वाचा >>>शांतता, ऐक्याचा संदेश देणारा दिवस..

गेली दहा वर्षे  आमचे सरकार जननायक कर्पुरी ठाकूरजी यांच्या मार्गावर चालले आहे, आमच्या योजना आणि धोरणांमध्ये परिवर्तनशील सशक्तीकरण आणले आहे.  कर्पुरीजींसारख्या काही नेत्यांना वगळून सामाजिक न्यायाची हाक केवळ राजकीय घोषणांपुरती मर्यादित राहिली, ही आपल्या राजकारणाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. कर्पुरीजी यांच्या दृष्टिकोनाने  प्रेरित होऊन आम्ही त्यांचा दृष्टिकोन हे  प्रभावी शासकतेचे प्रारूप म्हणून अमलात आणले. मी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगू शकतो की, गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त करण्याच्या भारताच्या कामगिरीचा  जननायक कर्पुरी ठाकूरजी यांना खूप अभिमान वाटला असता.

हे २५ कोटी लोक समाजातील सर्वाधिक मागास वर्गातील आहेत, ज्यांना वसाहतवादी शासनापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे सात दशके मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्या होत्या. याउलट, प्रत्येक योजनेचे १०० टक्के लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे सुनिश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे सामाजिक कल्याणाबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचे दर्शन घडते आहे. आज इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती आणि जमातीच्या समुदायांमधील लोक ‘मुद्रा योजने’मुळे उद्योजक बनू लागले असताना कर्पुरी ठाकूरजींचे आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न साकार होत आहे. तसेच आमच्या सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गाच्या आरक्षणाचा विस्तार केला आहे. आम्ही इतर मागास वर्ग आयोगाची स्थापना करण्यात यश मिळवले आहे (दुर्दैवाने ज्याला काँग्रेसने विरोध केला होता), जो आज कर्पुरीजींनी दाखवलेल्या मार्गावर काम करत आहे. आमची ‘पीएम-विश्वकर्मा योजना’ ही योजना भारतातील इतर मागास वर्गाच्या समुदायाच्या कोटय़वधी जनतेसाठी समृद्धीची नवी दालने देखील खुली करणार आहे.

मी स्वत:च इतर मागास वर्गातील असल्यामुळे जननायक कर्पुरी ठाकूरजींचा मी खूप आभारी आहे. दुर्दैवाने आपण कर्पुरीजींना अतिशय कमी वयात ६४ व्या वर्षी गमावले. आपल्याला अतिशय जास्त गरज असताना आपण त्यांना गमावले. तरीही ते कोटय़वधी जनतेच्या हृदयात आणि मनात त्यांच्या कामामुळे कायम राहतील. ते खऱ्या अर्थाने जननायक होते!