विसाव्या शतकात अर्थशास्त्रात अतिशय वेगळे स्थान निर्माण करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांच्या सिद्धांतांनी विमा, वैद्यकीय सुविधा, शेअर बाजार या संकल्पनांतील अर्थकारण बदलून गेले, त्यांचे नाव केनेथ जोसेफ अ‍ॅरो. या नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले.

गेली काही दशके त्यांनी अर्थशास्त्रात मोठे काम केले. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२१ रोजी  झाला. घडणीच्या काळात त्यांनी दारिद्रय़ जवळून पाहिले होते, त्यामुळे नंतर अर्थशास्त्रात संशोधन करताना त्यांनी सामाजिक न्याय व त्याबाबतचे पर्यायी मार्ग यावर भर दिला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून गणितात एम.ए. पदवी घेतली. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे १९. पदवी अभ्यास करीत असताना त्यांनी युद्धकाळात हवामान संशोधक म्हणून व एअर कोअर कॅप्टन म्हणून काम केले. काही काळ त्यांनी रॅण्ड कॉर्पोरेशनमध्ये व नंतर हार्वर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणून काम केले. अर्थशास्त्रातील अमेरिकेचे पहिले नोबेल विजेते पॉल सॅम्युअलसन यांनी अ‍ॅरो हे विसाव्या शतकातील महान अर्थशास्त्रज्ञ असल्याचे म्हटले होते. अ‍ॅरो यांची कारकीर्द घडली ती स्टॅनफर्ड विद्यापीठात. ११ वर्षे त्यांनी या विद्यापीठात काम केले. १९५१ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली होती, त्यात त्यांनी समाजाने निवडलेले पर्याय व व्यक्ती निवडत असलेले पर्याय यांचा संबंध दाखवला आहे. मतदान पद्धतीत नेहमी अनपेक्षित निकाल सामोरे येतात त्यावर अ‍ॅरो यांनी असे म्हटले होते की, समाज जे पर्याय निवडत असतो, ते विसंगत असतात. त्यामुळे योग्य सामाजिक पर्यायांसाठी चार घटकांची पूर्तता आवश्यक असते. कुठल्याही व्यवस्थेत ती होऊ शकत नाही. मागणी आणि पुरवठा या प्रश्नावर त्यांनी संशोधन केले होते. समजा, सफरचंद ही एक वस्तू घेतली तर त्याची किंमत व त्यांची मागणी संख्या जर सुसंगत असेल तर अंतिम भावाच्या माध्यमातील फलश्रुती चांगली असते असे त्यांनी म्हटले होते. हे केवळ एक वस्तूचे उदाहरण झाले, पण जर कृषी जमीन, शेतमजूर, बँक कर्ज अशा अनेक बाजारपेठांचा विचार केला तर त्या एकमेकांवर परिणाम करीत असतात.  कुठल्या विशिष्ट परिस्थितीत बाजारपेठा कोसळत नाहीत तर यशस्वी होतात याचे विवेचन त्यांनी केले होते.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?

व्यवहारातील आर्थिक समस्यांवर त्यांनी मोठे योगदान दिले त्यात विमा, आरोग्यसेवा व हवामान बदल यांचा समावेश होता. त्यांनी इकॉनॉमिस्टस स्टेटमेंट ऑन क्लायमेंट चेंजचे सहलेखन केले होते, त्यात त्यांनी हवामान बदलांच्या धोक्याबाबत इशारा दिला होता. सोशल चॉइस अ‍ॅण्ड इंडिव्हिज्युअल व्हॅल्युज या पुस्तकात त्यांनी बहुमताच्या मतदान नियमांतील फोलपणा दाखवून दिला होता, त्यात शेवटी भलताच निकाल कसा लागतो याचे विवेचन केले.

प्रा. अ‍ॅरो यांना १९७२ मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन आर हिकस् यांच्यासमवेत नोबेल मिळाले होते. बाजारपेठ अर्थशास्त्रातील सर्वसाधारण समतोलाचे विवेचन त्यांनी ग्राहक व उत्पादक यांच्यातील अन्योन्यसंबंधातून दाखवले होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जी ओबामा केअर आरोग्य योजना जाहीर केली होती, त्यात अ‍ॅरो यांच्या काही मुद्दय़ांचा विचार केला गेला होता. २००१ मधील अर्थशास्त्राचे नोबेल विजेते जोसेफ स्टिगलिझ यांनी त्यांचे काम डॉ. अ‍ॅरो यांच्या सुरुवातीच्या काही संकल्पनांतून प्रेरित आहे, असे म्हटले आहे. अ‍ॅरो हे बहुव्यासंगी होते, त्यामुळे त्यांनी इतर विषयांतील ज्ञानाची सांगड अर्थशास्त्रात घालून रोजच्या व्यवहारातील आर्थिक समस्यांची उकल सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला होता.