शेतातील माल निघाल्यानंतर त्यातील दमटपणा काढून टाकण्याची गरज असते. त्यामुळे साठवणीत माल खराब होत नाही. काही फळे वाळवून टिकविता येतात. ही क्रिया उन्हात ठेवून केली असता, सूर्यकिरणांमुळे त्यांच्या रुचीत, रंगात फरक पडण्याची शक्यता असते. पदार्थाची चव रंग गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी वेळात पदार्थ सुकविण्यासाठी सौर ड्रायरचा उपयोग होतो. यासाठी ५०-६० डिग्री सेल्सिअस तापमानाची हवा अशा पदार्थावरून खेळविली तर पदार्थ जास्त चांगले वाळतात. पदार्थाच्या प्रकारानुसार व सौर ड्रायरच्या रचनेनुसार सौर ड्रायरची विभागणी तीन प्रकारांमध्ये होते १) डायरेक्ट सौर ड्रायर, २) इनडायरेक्ट सौर ड्रायर, ३) टेंट टाइप सौर ड्रायर. १) डायरेक्ट सौर ड्रायर- या प्रकारच्या सौर ड्रायरमध्ये धान्य, फळे व भाजीपाला मुख्यत: सुकविला जातो. या सौर ड्रायरमध्ये सूर्याची किरणे काचेच्या पारदर्शक आवरणामधून पदार्थामध्ये शोषली जातात.   या सौर ड्रायरचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत. १) संकलक, २) पारदर्शक काचेचे आवरण, ३) पदार्थ ठेवण्यासाठी पात्र (ट्रे), ४) गरम हवा जाण्यासाठी चिमणी. या ड्रायरमध्ये सपाट भागावर वाळू, भाताचे तूस, लोखंडी स्क्रॅप यांच्यासारखा एखादा पदार्थ काळा रंग देऊन अंथरलेला असतो. हा काळा रंग विशिष्ट प्रकारचा असतो. याचा उपयोग सौर संकलनात उष्णता शोषून घेण्यासाठी होतो. सौर संकलक पेटीमध्ये चार वाळवणी ट्रेची रचना करण्यात येऊन यामध्ये सरासरी १०-१२ किलो धान्य किंवा १२ ते १५ किलो भाजीपाला सुकविला जाऊ शकतो. सौर ड्रायरचा आकार मोठा केल्यास, वाळवणी ट्रेचा आकार मोठा ठेवता येतो. एका वेळेस २५ ते ३० किलो धान्य व ३० ते ४० किलो भाजीपाला सुकविण्याची सोय करता येते. सौर संकलनाच्या वर पारदर्शक काचेचे आवरण दिलेले असून पारदर्शक काचेमधून सौर किरणे पदार्थाद्वारे शोषून घेतली जातात. सौर ड्रायरच्या खालील बाजूस थंड हवा आतमध्ये जाण्यासाठी सच्छिद्र अरुंद दार असते. वातावरणातील थंड हवा काळय़ा रंगाच्या गरम संकलकाच्या संपर्कात आल्यावर गरम होऊन वजनाने हलकी झाल्यामुळे नैसर्गिक गुणधर्माने वरच्या बाजूने सरकते. गरम हवा वरच्या बाजूने सरकताना पदार्थामधील आद्र्रता शोषून घेते. गरम हवा आर्द्रता शोषून घेतल्यावर पत्र्याच्या चिमणीवाटे बाहेरील वातावरणात सोडण्यात येते. पत्र्याच्या चिमणीला आतून बाहेरून उष्णताशोषक काळा रंग दिलेला असल्यामुळे गरम हवेचा झोत तयार होऊन धान्य व भाजीपाला लवकर सुकण्यास मदत होते. छोटय़ा डायरेक्ट सौर ड्रायरमध्ये धान्य (१६-१८ तास), हिरवा भाजीपाला (१०-१२ तास), कांदा (१८-२० तास), मिरची (१८-२०) तासांत सुकवता येते.   
सौर ड्रायरचे फायदे –
* धान्य हवाबंद संकलकामध्ये सुकविल्यामुळे पक्ष्यांपासून तसेच किडय़ांपासून संरक्षण
* धान्य, भाजीपाला व फळे वेगाने सुकवल्यामुळे नुकसान कमी होते.
* पदार्थातील आद्र्रता कमी केल्यामुळे साठवणीच्या काळात पदार्थाला बुरशी लागण्याचे प्रमाण नगण्य असते.
* सौर ड्रायरमध्ये धान्य सुकविल्यास धान्याचे कापणीपश्चात नुकसान कमी होते.*ल्ल    विजेची भरपूर बचत होऊन खर्चात बरीच बचत होते.   

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार