दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर लैंगिक अत्याचाराच्या दुर्मिळ गुन्ह्य़ांमध्ये लैंगिक खच्चीकरणाची शिक्षा देण्याचा विचार सरकार करीत आहे. यात गुन्हेगारांना विशिष्ट रसायने दर तीन महिन्यांनी टोचली जातात त्यामुळे त्यांची लैंगिक इच्छाशक्ती खूपच कमी होतो. हा नसबंदीसारखा प्रकार नसतो औषधे म्हणजेच रसायने बंद केल्यानंतर त्यांची लैंगिक क्षमता पूर्ववत होते. यात पुरूषांमधील टेस्टोस्टेरॉन हे लैंगिक उत्तेजन करणाऱ्या संप्रेरकाची निर्मिती एकदम कमी होते. सवयीच्या गुन्हेगारांना अशी रसायने टोचणे आवश्यक ठरते. १९६६ मध्ये प्रथम अमेरिकेत लैंगिक खच्चीकरणाची पद्धत वापरण्यात आली. अमेरिकेतील अनेक राज्यात कायद्यातच तशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.दक्षिण कोरियात २०१० मध्ये हा कायदा केला आहे. संगणक वैज्ञानिक अ‍ॅलन टय़ुरिंग याला समलैंगिकतेच्या गुन्ह्य़ाखाली १९५२ मध्ये इंग्लंडमध्ये अशी रसायने टोचली होती. पोलंड, मोलदोवा, एस्टोनिया अशा अनेक देशातही पद्धत वापरली जाते. इस्रायल, ऑस्ट्रेलिया व अर्जेटिनात ही वैकल्पिक शिक्षा आहे. लैंगिक खच्चीकरण करणारी औषधे ही पुरुषांमधील अँड्रोजेन या रसायनाच्या निर्मितीला अटकाव करतात.
या औषधांमध्ये सायप्रोटेरोन अ‍ॅसिटेट, डेपो प्रोव्हेरा, बेनपेरिडॉल, म्रेडोझायप्रोजेस्टेरोन अ‍ॅसिटेट, ल्युप्रोरेलिन(प्रोस्टॅप) यांचा समावेश होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Druges that use for sexual disbursement
First published on: 16-01-2013 at 05:32 IST