छोटया दुर्बणिच्या मदतीने केलेले उत्तम संशोधन
लुईसविली विद्यापीठातील  संशोधन करणाऱ्या एका गटाने करेन कॉलिन्स  हिच्या नेतृत्वाखाली शनी-सदृश ग्रह शोधला आहे. हा साधारण ७०० प्रकाश वर्ष अंतरावर आहे. ४ जून २०१३ या दिवशी झालेल्या ‘अमेरिकन अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या’ राष्ट्रीय बठकीत करेन कॉलिन्स हिने केइएलटी ६ बी  या ग्रहाचा शोध जाहीर केला.
कॉलिन्सच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्या या खगोल अभ्यासगटाने एका तार्याच्या समोरून जात असताना म्हणजेच ‘अधिक्रमण’ करत असताना हा ग्रह पाहिला. या आधी २०९४५८ हा ग्रह अशा प्रकारे सापडला आहे.  केइएलटी ६ बी हा नव्याने सापडलेला ग्रह या आधी सापडलेल्या  २०९४५८  या ग्रहाशी साम्य दाखवतोय.
  केइएलटी हे किलोडिग्री एक्सट्रिमली लिट्ल टेलिस्कोप  याचे लघुरूप आहे. या अंतर्गत अ‍ॅरिझोना मधील आणि दक्षिण आफ्रिकेतील   या दोन अतिशय लहान आकाराच्या दुर्बणिी आहेत. या एवढ्या लहान आहेत की यांची किंमत डिजिटल कॅमेऱ्यापेक्षा थोडिशीच जास्त आहे. गेल्यावर्षी   दुर्बणिीतून अतिशय थोडा वेळ हा ग्रह पाहिला गेला होता. हा नवीन ग्रह या हौशी खगोल अभ्यासकांतर्फे वापरल्या जाणाऱ्या दुर्बणिींच्या सहाय्याने शोधण्यात आल्याने या शोधाचे महत्व वेगळे आहे. कॉलिन्सच्या नेतृत्वाखाली संशोधन करणाऱ्या अभ्यासगटात ओहियो आणि वंडरबिल्ट अशा दोनही विद्यापीठातील हौशी खगोल अभ्यासक काम करत आहेत.
केइएलटी ६ बी हा ग्रह  कोमा बन्रेसिस या सिंह राशीजवळील तारकासमूहात आहे. हा ग्रह त्याच्या मातृ ताऱ्याभोवती दर ७.८ दिवसात एक फेरी पूर्ण करतो. याचा अर्थ त्याचे एक वर्ष आपल्या कालगणनेप्रमाणे ७.८ दिवसांचे आहे. पृथ्वीवरून पाहताना त्या ताऱ्यासमोरून तो फक्त ५ तास प्रवास करताना दिसतो. पाच तास हा जरी कमी वेळ वाटला तरी या पेक्षा कमी वेळात तार्याभोवती प्रदक्षिणा करणारे तारे या आधी पृथ्वीवरून निरीक्षणे घेणाऱ्या दुर्बणिींना सापडले आहेत. अशा प्रकारे अधिक्रमण करणारा ग्रह शोधण्याकरता कौशल्य आणि चिकाटीच्या जोडीलाच नशीबही असावे लागते. कारण त्या ग्रहाचे संपूर्ण अधिक्रमण पाहण्यासाठी ते सुरू झाल्यापासून पुढचे सलग सहा तास संपूर्ण अंधार असायला हवा. अशी संधी मिळणे आणि त्याचवेळी खगोल निरीक्षणास योग्य असे स्वच्छ वातावरण इतका वेळ सलग मिळणे ही अतिआवश्यक गोष्ट पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. कॉलिन्सला मूर वेधशाळेतून वेध घेताना अशी संधी दोन वेळा मिळाली.
केइएलटी ६ बी चे हे अधिक्रमण आजवरचे पृथ्वीवरून निरीक्षण केले गेलेले सर्वात जास्त वेळचे अधिक्रमण ठरले आहे.
कॉलिन्स ही इलेक्ट्रिकल इंजिनियिरगची विद्याíथनी आहे. खगोल अभ्यास हा तिच्या छंदाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तिच्या संशोधन कार्याकरता तिला नासाकडून विद्यावृत्ती मिळाली आहे. अशा प्रकारे ग्रह शोधण्याकरता  दुर्बणिीच्या मदतीने आकाशाच्या ठराविक भागाची वेगवेगळ्या वेळी छायाचित्रे घेतली जातात. या छायाचित्रात अर्थातच प्रचंड संख्येने असलेल्या तार्याचे फक्त ठिपके दिसतात. आकाशाच्या त्याच भागाच्या वेगवेगळ्या दिवशी घेतलेल्या छायाचित्रांटी तुलना करून त्यातील कोणत्या ताऱ्यांच्या  तेजस्वितेत बदल होतो आहे हे शोधले जाते. हे वाचूनच लक्षात येईल, की या कामाकरता अंगी अतिशय चिकाटी हवी. कॉलिन्सने अशा प्रकाराची चिकाटी दाखवत हे अतिशय किचकट काम करून तेजस्वितेत बदल झालेला तारा शोधून काढला. ज्या ताऱ्यांच्या बाबतीत असा बदल  आढळतो त्या तार्याची निश्चित जागा सांगणारे खगोलीय सह-निर्देशांक (को ऑर्डिनेटस) नोंदवले जातात. इतर मोठय़ा दुर्बणिींचा वापर करून त्या ताऱ्याची तपशीलवार निरीक्षणे नोंदवली जातात. कॉलिन्सने हा ग्रह शोधल्यावर त्या ग्रहाची निरीक्षणे हवाई बेटावरील  वेधशाळेतून घेतली जावीत याकरिता तिने विनंती केली. या निरीक्षणातून केइएलटी ६ बी या ग्रहाचा शोध निश्चित करण्यात आला.
केइएलटी ६ बी  हा वायुरूप ग्रह आहे. त्याचे वजन आणि आकार साधारण आपल्या सूर्यमालेतील शनी ग्रहाएवढे आहे. तो शनीसदृश असला तरी आपल्या शनीचे वैशिष्ट्य असलेली अनेक कडी या ग्रहाभोवती नाहीत. आजपर्यंत सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या  २०९४५८  या ग्रहाशी तो साम्य दाखवतो. शनीशी तुलना करता हायड्रोजन आणि हेलियम पेक्षा जड मूलद्रव्य यामध्ये सापडत नाहीत हा एक मुख्य फरक आहे. तो ज्या ताऱ्या भोवती फिरतो आहे तो तारा देखील साधारण आपल्या सूर्याच्या वयाचा आहे. ग्रह निर्मितीमधील विविध मूलद्रव्यांचा सहभाग हा
एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला ग्रह निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल जास्त माहिती देऊ शकेल. पण केइएलटी ६ बी  या नव्याने सापडलेल्या ग्रहावर जड मूलद्रव्य नसूनही तो चमकतो आहे. त्यामुळे हा ग्रह तुलनात्मक अभ्यासासाठी म्हणून वापरता येईल.
व्यावसायिक आणि हौशी खगोल अभ्यासकांच्या एकमेकांना पूरक अभ्यासातून किती महत्वाचा अभ्यास उभा राहू शकतो याच हे एक अतिशय सुंदर उदाहरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karen conlin find the new outside planet
First published on: 30-07-2013 at 09:47 IST