01 March 2021

News Flash

गारलिक प्रॉन्स

साहित्य: ३०० ते ४०० प्रॉन्स, एक चमचा तेल, चार ते पाच पाकळ्या (बारीक चिरलेला लसूण)

साहित्य:

३०० ते ४०० प्रॉन्स,

एक चमचा तेल,

चार ते पाच  पाकळ्या (बारीक चिरलेला लसूण),

एक जुडी कांद्याची पात चिरलेली,

अर्धी जुडी कोथिंबीर बारीक चिरलेली,

एक चमचा टॉमेटो केचप,

अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट.

कृती:

एका भांडय़ात तेल, लसूण, मीठ, शेंगदाणे, टॉमेटो केचप, कोथिंबीर, कांद्याची पात, हे सर्व मिक्स करून घ्यावे. त्यात सोललेले प्रॉन्स मिसळून अर्धा तास तरी ठेवून घ्यावे.

एका काचेच्या बाऊलमध्ये हे सर्व टाकून मायक्रो हायवर पाच मिनिटे ठेवा.

गरम गरम खायला द्या.

चीज अ‍ॅण्ड स्प्रिंग ओनियन सूप

साहित्य:

५० ग्रॅम बटर,

५० ग्रॅम मैदा,

एक ते अर्धा चमचा चिली फ्लेक्स,

दोन वाटय़ा क्रीम, १०० ग्रॅम चीज,

दोन वाटी व्हेज स्टॉक,

मिठ चवीनुसार.

कृती :

एका काचेच्या भांडय़ात बटर, बारीक चिरलेले स्प्रिंग ओनियन घालून मायक्रो हायवर तीन मिनिटे ठेवा. त्यात मैदा, चिली व मीठ टाकून मायक्रो लोवर दोन मिनिटे ठेवावे. सर्व मैदा नीट मिसळून द्यावा. त्याच्या गुठळय़ा नाही होणार, असे निसळून घ्यावे. त्यात व्हेज स्टॉक टाकून मायक्रो मीडियमवर दोन  मिनिटे ठेवावे. व शेवटी क्रीम टाकून मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. त्यात चीज घालून हळुवारपणे मिसळले जाईपर्यंत हलवून खायला द्यावे. चीज अगोदर टाकल्यास मायक्रोमध्ये लवकर जळते म्हणून चीज सर्वात शेवटी टाकावे.

प्रॉन्स नुडल्स

साहित्य:

अर्धी वाटी गाजर,  अर्धी वाटी कांदापात,

अर्धी वाटी कोबी, ल्ल    पाच-सहा हिरव्या मिरच्या.

दोन चमचे टॉमेटो केचप, ल्ल    दोन चमचे चिली सॉस,

५/६ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला.       ल्ल    मीठ चवीनुसार,

एक पाकीट नूडल्स,     ल्ल    अर्धी वाटी तेल.

ओनियन,      ल्ल    हिरवी मिरची,

लसूण बारीक चिरून घ्यावेत.      ल्ल    नुडल्स उकडवून घ्यावेत.

कृती:

काचेच्या एका बाऊलमध्ये तेल घालून त्यात गाजर, ओनियन, कोबी, मिरची लसूण घालावे. मायक्रो मीडियमवर चार मिनिटे ठेवावे. त्यात चिली व टॉमेटो सॉस टाकावा व मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. सर्व नीट मिसळून घ्यावे. त्यात उकडलेले नुडल्स टाकून हळुवार मिसळून घ्यावे. मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवून गरमागरम वाढावे.

थाय रेड करी चिकन

साहित्य:

एक वाटी नारळाचा चव, ल्ल    अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली,

२५० ग्रॅम शिजवलेले चिकन,     ल्ल    अर्धी वाटी थाय जिंजर,

पाच ते सहा ड्राय प्रॉन्स, ल्ल    तीन ते चार लाल मिरच्या,

चार ते पाच पाने बेझिल, ल्ल    मीठ चवीप्रमाणे.

एक चमचा साखर.

कृती:

बेझिल, लाल मिरच्या यांची पेस्ट करून घ्यावी. एका काचेच्या बोलमध्ये हे मिश्रण घालून दोन वाटय़ा पाणी घालावे व मायक्रो हायवर तीन मिनिटे ठेवावे. नंतर त्यात शिजलेले चिकन व नारळाचा चव घालून मायक्रो लोवर पाच मिनिटे ठेवावे.

भाताबरोबर खायला द्यावे.

बादशाही तुकडा

साहित्य:

पाच ते सहा ब्रेड स्लाइस, ल्ल    चार ते पाच रस मलाई,

चार ते पाच मोठे गुलाब जाम,    ल्ल    एक वाटी दूध,

दोन टेबल स्पून साखर, ल्ल    अर्धा वाटी ड्रायफ्रुटचे तुकडे.

कृती:

दुध व साखर एकत्र करून मायक्रो मीडियमवर तीन मिनिटे ठेवावे. ब्रेडचे तुकडे गॅसवर तुपात लाइट ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे किंवा टोस्ट करून घ्यावे. तळलेले स्लाइस दुधात बुडवून प्लेटमध्ये ठेवावे. त्यावर रस मलाई, गुलाबजाम पातळ काप करून ठेवावे. मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. त्यावर ड्रायफ्रुट घालून सव्‍‌र्ह करावे.
विवेक ताम्हणे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:06 am

Web Title: food recipes 30
Next Stories
1 ब्रोकोली चीझ बॉल्स
2 राजमा
3 स्पाइशी कॅशो कुकीज
Just Now!
X