(Logical Reasoning and Analytical Ability)

*  शाब्दिक बुद्धिमत्ता : (Non-Verbal Reasoning)

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
reservation in indian constitution to bring equality in society
संविधानभान : समतेची बिकट वाट
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

*  अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-Verbal Reasoning)

*  शाब्दिक बुद्धिमत्ता : ((Verbal Reasoning)

) सामान्य मानसिक क्षमता : या विभागावर पुढे नमूद केलेल्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात-

मालिका पूर्ण करणे, समान संबंधांची जोडी पूर्ण करणे, दिलेल्या घटकातील विसंगत घटक शोधणे,

आकृत्यांमधील रिकाम्या जागा शोधणे, वेन आकृत्यांचा वापर करून विविध घटकांतील परस्परसंबंध स्पष्ट करणे, आकृत्यांची (त्रिकोण, चौकोन, चौरस, आयात इ.) संख्या मोजणे, दिशाबोध (दिशाज्ञान चाचणी), नातेसंबंधावर आधारित प्रश्न, रांगेतील क्रम व मोजणी यांवरील प्रश्न आणि दिनदíशका, घडय़ाळ, वय यांवर बेतलेले प्रश्न.

ब) विश्लेषण क्षमता चाचणी

* वर्गीकरण : दिलेल्या माहितीचे पृथ:क्करण करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.

  • तुलना : काही वस्तूंच्या विशिष्ट गुणधर्मानुसार दिलेल्या माहितीचा योग्य क्रम लावणे.
  • आसनव्यवस्था : काही व्यक्तींची अथवा वस्तूंची ओळीत किंवा वर्तुळाकार रचनेतील बठकव्यवस्थेबाबत माहिती दिलेली असते. त्यांचा योग्य क्रम लावून प्रश्नांची उत्तरे देणे.
  • निर्णयक्षमता : एखाद्या बिकट प्रसंगी उमेदवार प्रसंगावधानाने कोणता निर्णय घेऊ शकेल यावर आधारित प्रश्न.

) तर्कशास्त्रीय युक्तिवाद : यात पुढील बाबी समाविष्ट होतात..

  • तर्क व अनुमान :

यांत विधानांमध्ये माहिती दिली जाते. ही माहिती पूर्णपणे सत्य मानून निष्कर्ष काढणे अपेक्षित असते.

  • विधान- गृहीतके :

यामध्ये दिलेल्या विधानामागे दडलेल्या गृहीतकांवर प्रश्न विचारले जातात. त्यावरून विधानासाठी कोणती गृहीतके अध्याहृत आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले जातात.

  • विधान – विवाद :

यात एका विषयासंदर्भात दोन मुद्दे मांडलेले असतात. त्या मुद्दय़ांच्या पुष्टय़र्थ दिलेले कारण किती सबळ आहे या आधारे प्रश्न विचारले जातात.

अशाब्दिक बुद्धिमत्ता : (ठल्ल-श्ी१ुं’ फीं२ल्ल्रल्लॠ) :

  • मालिकापूर्ती :

यात आकृत्यांची मालिका दिलेली असते. त्या मालिकेतील आकृत्यांमध्ये असणारा संबंध ओळखून, प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी आकृती पर्यायांमधून शोधायची असते.

  • समान संबंध :

यामध्ये चार आकृत्यांपकी कोणत्याही तीन आकृत्या दिलेल्या असतात. पहिल्या व दुसऱ्या आकृतीत जो संबंध असतो, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीत असतो. प्रथम दिलेल्या जोडीतील आकृत्यांमधील संबंध शोधून त्यानुसार प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी आकृती पर्यायांमधून निवडायची असते.

  • विसंगत आकृती शोधणे :

यामध्ये काही आकृत्यांचा समूह असतो, त्यापकी एक आकृती वगळता इतर सर्व आकृत्यांमध्ये विशिष्ट समान गुणधर्म आढळतो. त्या गुणधर्मास अपवाद असणारी आकृती हे आपले उत्तर असते.

  • आरशातील प्रतिमा व जल प्रतििबब :
  • एखादी आकृती आरशात कशी दिसेल अथवा तिचे पाण्यातील प्रतििबब कसे असेल यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
  • अपूर्ण आकृती पूर्ण करणे :

यामध्ये पूर्ण आकृतीचा काही भाग पर्यायांमधून शोधायचा असतो.

  • घन व सोंगटय़ा :

यातील प्रश्नांमध्ये मोठय़ा घनास रंगवून, लहान घनांत तुकडे करणे व सोंगटय़ांच्या स्थितीवर आधारित प्रश्न विचारले       जातात.

  • मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण ((Basic Numeracy) ::

मूलभूत संख्याज्ञान या उपघटकांतर्गत परीक्षार्थीनी काळ, काम, वेग यांवरील उदाहरणे शेकडेवारी, सरासरी, वयांवरील उदाहरणे, तसेच बोटींशी संबंधित उदाहरणे, लसावि-मसावि व जर शक्य झालेच तर मांडणी व जुळवणी तसेच संभाव्यता  याचा अभ्यास करावा.