18 November 2017

News Flash

हेअर केअर इन विंटर सीझन..

हिवाळा उंबरठय़ावर येऊन उभा आहे. या मोसमाचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी

प्रतिनिधी- styleit@gmail.com | Updated: November 16, 2012 8:01 AM

हिवाळा उंबरठय़ावर येऊन उभा आहे. या मोसमाचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी सर्वानीच उबदार तयारी चालवली आहे. केसांवरही थंडीचा परिणाम होतो. त्यामुळे थंडीत त्यांची विशेष काळजी घेणं आणि त्यांचं संरक्षण करणं आवश्यक असतं. हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, कारण थंड, शुष्क हवामानामुळे केस चटकन तुटू शकतात तसंच ते खूप गुंततात.
केसांची घ्या खास काळजी- गरम केलेलं खोबरेल तेल कंडिशनरचं काम करतं आणि ते टाळूला तसंच केसांना आवश्यक पोषण आणि आद्र्रता पुरवतं. दर वेळेस केस धुण्यापूर्वी  केसांना तेल लावावं (आठवडय़ातून तीनदा). त्यामुळे केसांमधली आर्द्रता राखली जाते.
नैसर्गिक मार्गाचा अवलंब करा- थंडीत केसांसाठी केमिकल्स वापरलीत तर तुमच्या समस्या आणखी वाढतील. त्यामुळे केसांसाठी नैसर्गिक गोष्टी आणि पद्धतींचाच अवलंब करावा. उदाहरणार्थ केसांसाठी घरगुती मास्क बनवावा. अंडी आणि कोमट खोबरेल तेलाचं मिश्रण केसांना लावल्यामुळे केसांना उत्तम कंडिशनिंग मिळतं, जे थंडीत अत्यंत आवश्यक असतं.
टेक्नोलॉजीपासून थोडं दूरच राहा- केसांची फॅशन करण्यासाठी ब्लो ड्रायर्स/ हेअर कर्लर्सचा अतिरिक्त वापर टाळावा. कारण त्यामुळे केस कमालीचे शुष्क आणि कोरडे बनतात. गरम खोबरेल तेलाने नियमितपणे केसांना मसाज केल्याने केसांना आर्द्रता तर मिळतेच, शिवाय ते नियंत्रणात राहतात. त्यामुळे केसांची कोणतीही फॅशन करणं अधिक सोपं आणि आनंददायी बनतं.
केसांची काळजी घ्या, आतून तशीच बाहेरूनही- दररोज किमान आठ ते नऊ ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे शरीरातली आद्र्रता राखली जाते. भरपूर ताजी फळं आणि भाज्या खा, त्यामुळे केसांचं शरीरांतर्गत आरोग्य राखलं जाईल. दूध, दही, मोड आलेली कडधान्यं आदी प्रोटिन्सयुक्त गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश असावा. या गोष्टींमुळे केसांना आवश्यक असलेलं पोषण मिळतं.
केस ओले असताना घराबाहेर पडू नका- केस ओले असताना ते तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ते ओले असताना शक्यतो घराबाहेर जाऊ नये. दिवसा केस ओले असताना घराबाहेर पडणं आवश्यकच असेल तर केसांभोवती स्कार्फ गुंडाळावा किंवा टोपी घालावी. त्यामुळे धूळ आणि इतर प्रदूषणापासून केसांचं रक्षण होतं.
पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड नॉलेज सेंटरच्या डॉ. रश्मी शेट्टी सांगतात,
‘गरम खोबरेल तेलाने केसांना मसाज केल्याने टाळूला वंगण मिळतं आणि ते शुष्क बनत नाहीत. तसंच टाळूच्या त्वचेचे पापुद्रे निघत नाहीत. मसाजमुळे रक्ताभिसरणाला गती मिळते. तेलाच्या डीप कंडिशनिंग गुणधर्मामुळे केस मुळापासून बळकट बनतात. अनुष्काने सुचविल्याप्रमाणे थंडीत केसांच्या काळजीसाठी पूर्णत: नैसर्गिक मार्गाचा अवलंब करावा. रोजमेरी आणि थाइमसारख्या हब्र्ज केवळ सुगंधीच नाहीत तर ते केसांना बळकट आणि निरोगी बनवतात आणि त्यांची चमक वाढवतात.’
– स्त्रियांच्या केसांच्या काळजी घेण्यामध्ये तेल लावणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड कोकोनट हेअर ऑइलमधून केसांना आवश्यक असणारं पोषण मिळतं, ज्यामुळे केस निरोगी, बळकट आणि सुंदर बनतात. मी अनेकदा श्ॉम्पूू आणि कंडिशनर बदलले आहेत, पण एक गोष्ट कधीही बदलली नाही. ती म्हणजे पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड कोकोनट हेअर ऑइल.
– खोबरेल तेलाने मसाज केल्यास टाळूमधलं रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे केस निरोगी बनतात आणि त्यातली आर्द्रतेची पातळीही वाढते. खोबरेल तेलाने मसाज केल्याने केसांमधले स्टॅटिक चार्जेस कमी होऊन ते भुरभुरत नाहीत. केस मऊसूत बनतात आणि त्यांच्यातली चमक कायम राहते.

यंदाच्या हिवाळ्यात त्वचा तजेलदार राखण्यासाठी काही सोप्या टिप्स-
* सूर्याच्या प्रकोपापासून त्वचेचं संरक्षण करा- हिवाळ्यातला सूर्यही त्वचेला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याच्या १५ मिनिटं अगोदर चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला विसरू नका. अशाने त्वचेचं सूर्यापासून रक्षण होतं.
* दररोज त्वचेची काळजी घ्या- त्वचेची काळजी दररोज घेणं आवश्यक आहे. त्यासाठी क्लेन्झिंग, टोनिंग आणि स्पेशल मॉइश्चरायझिंग असा क्रम रोज पाळावा. वर्षांतला कोणताही काळ असो, त्वचेला मॉइश्चराइझ करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोकोनट बेस्ड मॉइश्चरायझर्स उत्तम असतात. ही मॉइश्चरायझर्स त्वचेला दिवसभर आर्द्रता पुरवून तजेलदार ठेवतात.
* आहार असावा निरोगी- फळं, दही आणि हिरव्या भाज्या- मला नैसर्गिक आहार आवडतो आणि त्यामुळेच मी फिट राहू शकते. त्वचेला योग्य आर्द्रता मिळावी यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. ताज्या फळांचे ज्यूस आणि नारळपाणी त्वचेसाठी वरदायी ठरतात, कारण ते शरीरातले सर्व विषारी घटक काढून टाकतात.
नियमित व्यायाम करा- दररोज अर्धा तास व्यायाम केल्याने मन आणि शरीर ताजंतवानं राहतं.

पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड स्किन एक्स्पर्ट डॉ. जयश्री शरद सांगतात,
’ हिवाळ्यातल्या कोरडय़ा हवामानामुळे शरीरातली आर्द्रता झपाटय़ाने कमी होत असल्याने दररोजच्या स्किन केअर क्रमामध्ये मॉइश्चरायझिंगला प्राधान्य असलं पाहिजे. अशा वेळी कोकोनट बेस्ड मॉइश्चरायझर्स उत्तम काम करतात, कारण ती त्वचेतल्या बॅरिअर्सचं संरक्षण करतात, तसंच त्वचेच्या पृष्ठभागावरून आद्र्रता उडून जाऊ नये, याची काळजी घेतात. त्यामुळे त्वचा दिवसभर मऊ आणि तजेलदार राहते.
* सनस्क्रीन केवळ उन्हाळ्यातच नाही तर थंडीतही वापरलं पाहिजे. हिवाळ्यातला सूर्य तुलनेने कमी प्रखर वाटत असला तरी तो उन्हाळ्यातल्या सूर्याएवढाचा घातक ठरू शकतो.
* हिवाळ्यात त्वचेला घरगुती मास्क लावावेत. उदा. दह्य़ात वाटलेले बदाम आणि नारळाचं दूध घालून ते एकजीव करावं. हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
* अव्हॅकॅडोजमध्ये खोबरेल तेलाचे थोडे थेंब घालून हे मिश्रण आंघोळीआधी अख्ख्या शरीराला लावावं. २० मिनिटांनंतर हे मिश्रण काढून टाकून आंघोळ करावी. अशाने त्वचा ताजीतवानी तर होईलच, शिवाय तजेलदार दिसेल.

First Published on November 16, 2012 8:01 am

Web Title: styleit
टॅग Hair,Hair Style,Styleit